विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बराच वाद घातल्यानंतर 85 चा फॉर्म्युला बाहेर काढला. तो त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकला, पण 85 फॉर्मुलाच्या आकड्याची बेरीज नाना पटोले यांनी चुकवली. 255 आकड्याऐवजी नानांनी 270 चा आकडा सांगितला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना साधी बेरीज करता येत नाही म्हणून आघाडीची माध्यमांमध्ये अब्रू गेली. Sharad Pawar
पण मुळात 85 आकड्याचा फॉर्मुला आला तरी कोणाच्या डोक्यातून??, याची चर्चा माध्यमांमध्ये वेगळ्या पद्धतीने सुरू झाली. कालच माध्यमांनी शरद पवारांकडे बोट दाखविले. तेच खरे असल्याचे संजय राऊत यांच्या तोंडून आज बाहेर आले.
Maharashtra Board महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय!, आता विद्यार्थ्यांना नापास होण्याची चिंता नाही
त्याचे झाले असे :
जागावाटपाचा घोळ फारच लांबल्यानंतर संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई सगळेजण सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 85 जागांवर लढायची बोलणी निश्चित झाली आहेत. ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवरती मित्र पक्षांशी बोलणी सुरू आहेत, इतर काही जागांवर ही चर्चा सुरू आहे. त्यावर आज संध्याकाळपर्यंत निकाल घ्यावाच लागेल. फार घोळ घालून चालणार नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. Sharad Pawar
अर्थातच 85 चा फॉर्म्युला शरद पवारांच्या डोक्यातून समोर आल्याचे या निमित्ताने उघड झाले. त्या बैठकीला बाळासाहेब थोरात हजर होते. त्यावेळी पवारांच्या सूचनेवर बाळासाहेबांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली की नाही, हे समजायला मार्ग नाही, पण 85 चा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. शरद पवारांनी 85 आकड्याचा “डाव” टाकून काँग्रेसला डबल डिजिट वर खेचून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बरोबरीला आणून ठेवले, हे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी कालच्या सायंकाळच्या पत्रकार परिषदेनंतर देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना बैठक घ्यायला लावली. Sharad Pawar
त्याचवेळी विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस 100 ते 105 जागा लढवेल, असे परस्पर जाहीर करून टाकले. त्यामुळे काँग्रेस पुन्हा ट्रिपल डिजिटवर अडून बसल्याचे उघड झाले. पवारांच्या 85 फॉर्मुलाचा “डाव” उधळून लावायचा काल सायंकाळच्या पत्रकार परिषदेनंतरच प्रयत्न सुरू झाला. तो आज मध्यावर येऊन ठेपला. काँग्रेस 100 जागा लढवेल, तर शिवसेना देखील सेंच्युरी मारेल, असे संजय राऊत यांना म्हणावे लागले. पण पवारांनी “डाव” टाकून उभे केलेले 85 फॉर्मुल्याचे मुसळ दुसऱ्याच दिवशी केरात जायला सुरुवात झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App