तीन पक्षांनी समन्वय साधत सर्वांना समसमान जागा घेतल्या म्हणत सर्वात जास्त उबाठासैनिक स्वतःची पाठ खाजवून माफ करा थोपटून घेत आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा काही आकडे टाकतोय. शिव्या नं घालता त्यांनी ह्या पोस्टवर प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा नाहीच. आईवडिलांचे संस्कार दाखवायची त्यांची उबळ त्यांना लखलाभ.. Satire over shivsena UBT and MVA 85 formula
भूतकाळातल्या युतीत भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष होते. युतीच्या आधी सेनेचे आमदार भाजपपेक्षा कमी होते. आता पुढचं वाचा डोळे उघडे ठेऊन.
साल १९९५ – सेनेने २८८ पैकी १६९ जागा लढल्या. आणि भाजपने ११६. भाजपपेक्षा शिवसेनेने ५५ जागा जास्त लढल्या.. इथे शिवसेनेचे ७३ आमदार निवडून आले होते आणि भाजपचे ६५ (स्ट्राईक रेट कोणाचा जास्त? अडाण्याला पण कळेल)
साल १९९९ – सेनेने २८८ पैकी १६१ जागा लढल्या. आणि भाजपने ११७. भाजपपेक्षा शिवसेनेने ४४ जागा जास्त लढल्या.. इथे शिवसेनेचे ६९ आमदार निवडून आले होते आणि भाजपचे ५६ (स्ट्राईक रेट कोणाचा जास्त?अडाण्याला पण कळेल)
साल २००४ – सेनेने २८८ पैकी १६३ जागा लढल्या. आणि भाजपने १११. भाजपपेक्षा शिवसेनेने ५२ जागा जास्त लढल्या.. इथे शिवसेनेचे ६२ आमदार निवडून आले होते आणि भाजपचे ५४ (स्ट्राईक रेट कोणाचा जास्त? अडाण्याला पण कळेल)
साल २००९ – सेनेने २८८ पैकी १६० जागा लढल्या. आणि भाजपने ११९. भाजपपेक्षा शिवसेनेने ४१ जागा जास्त लढल्या.. इथे शिवसेनेचे ४५ आमदार निवडून आले होते आणि भाजपचे ४६ (स्ट्राईक रेट कोणाचा जास्त? अडाण्याला पण कळेल)
२०१४ साली युती नव्हती, म्हणून त्याचे आकडे टाकत नाही. पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कि २०१४ पर्यंत युतीत केवळ दोनच पक्ष होते तरीही शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा लढूनसुद्धा तुलनेने भाजपने जास्त यश मिळवले. तरीही पुढच्या निवडणुकीत शिवसेनेलाच झुकतं माप दिलं गेलं आणि भाजपने कमी जागा लढणे स्वीकारले. शिवसेनेची अशी नेहमीचीच अपेक्षा असेल तर कि अजूनही त्यांनी कितीही माती खाल्ली तरीही त्यांनी अजूनही भाजपपेक्षा जास्त जागा लढवल्या पाहिजेत तर त्यांनी कडेकडेने गोविंदबागेच्या शेजारी मातोश्री ३ बांधावी.
२०१९ साली मात्र भाजपने (१५२ जागा) सेनेचे (१२४ जागा) लाड थांबवले आणि सेनेपेक्षा जास्त जागा लढवून ‘तुलनेने’ सर्वात जास्त आमदार निवडून आणले. कदाचित म्हणून गद्दारीचा नवा अध्याय उद्धवजींनी लिहायला घेतला आणि राज्याची वाट लावणारी मविआ सत्तेत आणली.
हे सगळे आकडे डोळ्यासमोर ठेऊनसुद्धा जर कोणाला “८५ जागा मिळाल्या” म्हणत नाचायचं असेल तर त्यांच्या राशीला संजय राऊत नावाचा #@$%$ ग्रह आयुष्यभर मजबूत लागो..
कट्टर पेंग्विन लवर
– चेतन दीक्षित
(घ्या स्वबळावरचा विनोद.. )
(सदर लेख फेसबूक च्या माध्यमातून)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App