याआधीही करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी वडोदरा येथे लॉरेन्सच्या एन्काऊंटरची मागणी केली होती.
विशेष प्रतिनिधी
वडोदरा : Lawrence Bishnois गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करणी सेनेने केला आहे. करणी सेनेचे नेते राज शेखावत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ते म्हणतात की, जो पोलिस लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करेल. त्याला बक्षीस म्हणून 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये देणार आहेत. त्या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आपली जबाबदारी असेल. शिवाय लॉरेन्सचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसाला क्षत्रिय करणी सेना पूर्ण पाठिंबा देईल असंही ते म्हणाले आहेत.Lawrence Bishnois
व्हिडिओच्या शेवटी राज शेखावत म्हणतात, ‘जय माँ करणी.’ राज शेखावत सध्या मध्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना क्षत्रिय महासंमेलनात येण्याचे निमंत्रण दिले होते. अलीकडे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या उच्च सुरक्षा साबरमती तुरुंगात बंद आहेत. लॉरेन्सने सलमान खानला धमकी दिली आहे. याआधीही करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी वडोदरा येथे लॉरेन्सच्या एन्काऊंटरची मागणी केली होती. केंद्र सरकारही चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे ते म्हणाले होते. अखेर अशा गुंडांना आश्रय का दिला जात आहे? असा सवालही त्यांनी केलेला आहे.
तुरुंगात बसून तो लोकांची हत्या करत आहे. लोकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे. केंद्र सरकार या गोष्टी का लपवत आहे? एका गुंडामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 22 डिसेंबरला अहमदाबादमध्ये क्षत्रिय एकता महासंमेलन होणार आहे. याबाबत क्षत्रिय समाजाच्या जाहीर सभा होत आहेत. राज शेखावत एक दिवस आधी झालेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठीच वडोदरा येथे पोहोचले होते. आता त्यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App