विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना चॅलेंज दिले. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून दाखवा!!, मग आम्ही ताबडतोब आमचे नाव जाहीर करू, असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis target to sharad pawar
लाडकी बहीण योजनेपासून अटल सेतू पर्यंत आणि शेतकऱ्यांना मोफत वीजेपासून ते सौर पंपांपर्यंत सगळ्या योजनांचा आढावा घेणारे महायुती सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते हजर होते.
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान दिले. त्यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून दाखवावा, मग महायुती ताबडतोब मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करेल, असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी या एका आव्हानातून महाविकास आघाडीत नेम धरून बाण मारला. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते.
परंतु, काँग्रेस आणि शरद पवारांनी ते आवाहन फेटाळून लावले होते. कारण काँग्रेसला स्वतःचा नेता मुख्यमंत्री करायचा आहे आणि शरद पवारांना त्यांच्या मनातला म्हणजेच सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. पण पवारांनी आजपर्यंत एकदाही स्वतःच्या तोंडून सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीरपणे घेण्याची हिंमत केलेली नाही. कारण एकदा का पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीरपणे घेतले, की ताबडतोब त्यांच्या नावाला सर्वांच्या पक्षांमधून जोरदार विरोध सुरू होईल, याची पक्की जाणीव पवारांना आहे. म्हणूनच ते जाहीरपणे सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याची हिंमत करत नाहीत.
नेमका हाच मुद्दा हेरून महायुतीच्या रिपोर्ट कार्ड सादरीकरणाच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आव्हान दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App