काँग्रेसने उमेदवारी देत खेळला सेफ गेम
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Priyanka Gandhi केरळमधील वायनाड लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यासोबतच काँग्रेस पक्षाने केरळच्या चेलाक्करा विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकीसाठी रम्या हरिदास आणि पलक्कड जागेसाठी राहुल ममकूटाठी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. वायनाड जागेवर 13 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.Priyanka Gandhi
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर आता वायनाड मतदारसंघावर पोटनिवडणूक होत आहे. ज्यावेळी राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली होती, त्यावेळी काँग्रेसने या जागेवरील पोटनिवडणुकीत प्रियंका गांधीच उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत त्या पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळत होत्या, मात्र आता त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
या वर्षी जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यातील एक वायनाड तर दुसरी उत्तर प्रदेशची रायबरेली जागा होती. या निवडणुकीत राहुल यांनी दोन्ही जागांवर बंपर विजय मिळवला. अशा स्थितीत त्यांना एक जागा सोडावी लागली. राहुलने वायनाड सोडण्याचा निर्णय घेतला पण कुटुंबातील एका सदस्याला उभे करण्याचे आश्वासनही दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App