दक्षिण चीन समुद्राबाबत उचलले हे मोठे पाऊल! ASEAN-India Summit
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसियान-इंडिया समिट 2024 मध्ये हजेरी लावली. मोदींनी आसियान देशांसोबतही मंच शेअर केला आहे. या कार्यक्रमाचे फोटोही समोर आले आहे, ज्यामध्ये सर्व नेत्यांसोबत मोदी मध्यभागी उभे आहेत. हे चित्र आसियान देशांमध्ये भारताचा प्रभाव दर्शवते. मात्र, मोठी गोष्ट म्हणजे या परिषदेत चीनविरुद्ध मोठी खेळी करण्यात आली आणि दक्षिण चीन समुद्राबाबत मोठे पाऊल उचलण्यात आले.
दक्षिण चिनी समुद्रावरील आपल्या ताब्यावरुन चीन आपल्या शेजारी देशांना दादागिरी करत आहे. त्यामुळेच दक्षिण चीन समुद्राबाबत चीन आणि अनेक देशांमधील तणाव वाढत आहे. याला तोंड देण्यासाठी भारत आणि आसियान देशांनी दक्षिण चीन समुद्राबाबत मोठी पावले उचलली. या सर्व देशांनी दक्षिण चीन समुद्राबाबत आचारसंहिता (COC) आणावी, त्यावर स्वाक्षरी करावी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले आहे. ही आचारसंहिता 1982 च्या UNCLOS सह आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असेल.
राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!
आसियान देशांच्या या पावलामुळे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या अनियंत्रित कारवायांना आळा बसेल. प्रदेशात शांतता, स्थैर्य, सागरी सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाईल. दक्षिण चिनी समुद्रातून इतर देशांच्या जहाजांची ये-जा करण्याची गरजही बळकट होईल. याशिवाय, अडथळामुक्त वैध सागरी व्यापार आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर बेकायदेशीरपणे दावा करतो आणि या भागात फिलिपाइन्सच्या जहाजांवर वारंवार हल्ले करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App