नाशिक : जम्मू – कश्मीर मधल्या विजयापेक्षा हरियाणातला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलाच, पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधी, शरद पवार आणि मनोज जरांगे त्याचबरोबर “इंडी” आघाडीतल्या बाकीच्या नेत्यांनी चालविलेला जातींमध्ये फुटीचा अजेंडा हरियाणात अपयशी ठरल्याने या नेत्यांच्या पोटात कळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा अजेंडा राजकीय सेंटर स्टेजवर मजबुतीने प्रस्थापित झाल्यानंतर राहुल गांधींनी जातिगत जनगणनेची मागणी करून हिंदू मधल्या जातीजातींमध्ये फूट पाडण्याचा अजेंडा चालवला होता. त्यात वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांना इंधन पुरवठा केला होता. महाराष्ट्रातून शरद पवार मनोज जरांगे यांनी मराठा + मुस्लिम ध्रुवीकरणाच्या प्रयत्न करून जातिगत अजेंड्याला मोठे बळ दिले. त्यातून हिंदूंच्या मतांमध्ये फूट पडली. त्याचा दुष्परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसला. हाच परिणाम हरियाणा विधानसभा निवडणुकीत दिसण्याची अपेक्षा काँग्रेसला होती. सुरुवातीला शेतकऱ्यांचे आंदोलन, नंतर पहिलवानांचे आंदोलन या मार्गाने हरियाणात आधीच बळकट असलेला जाती वर्चस्वाचा अजेंडा अधिक रुजवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. परंतु प्रत्यक्षात भाजपने तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे नेटवर्क राबवून काँग्रेसचा अजेंडा अयशस्वी ठरविला.
हरियाणात भाजपने पॉलिटिकल टायमिंग उत्तम साधत नेतृत्व बदल केला मनोहर लाल खट्टर यांना केंद्रात सामावून घेत नायब सिंग सैनी यांना हरियाणातील सूत्रे सोपविली. त्यापूर्वी भाजपने पुरेसे होमवर्क केले होते. त्यानंतरच निवडणुकीची सूत्रे देखील नायबसिंग सैनींकडे सोपविली. भाजपने जास्तीत जास्त सोशल इंजिनिअरिंग करून तिकीट वाटप केले. जातनिहाय जनगणनेची मागणी करून त्याला सामाजिक न्यायाच्या मुलामा पुन्हा एकदा हरियाणात जाट वर्चस्व निर्माण काँग्रेसचा करायचा इरादा होता. तो भाजपने उद्ध्वस्त केला. हा हरियाणातल्या निवडणूक निकालाचा खरा अर्थ आहे.
Haryana result : हरियाणाच्या निकालात भाजपच्या बहुमताच्या पुढे, इकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ
याचा परिणाम महाराष्ट्रात वेगळे अर्थाने दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने शरद पवार आणि काँग्रेस यांनी मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन तयार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण प्रत्यक्षात हा हिंदूंच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा “डाव” आहे. पण हरियाणातल्या विजयामुळे आता भाजपच्या बाहूंमध्ये नवे बळ संचारले आहे. या बळातूनच महाराष्ट्रातला मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनचा जातीय अजेंडा तोडण्याची महाराष्ट्र देखील भाजपला संधी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात जातीचा अजेंडा तोडायला प्राधान्य
भाजपचा “माधव” प्रयोग हा त्यातला एक घटक आहे. भाजपला महाराष्ट्रात सर्वसमावेशक सोशल इंजिनिअरिंग करावे लागणार आहे. त्या दिशेने पक्षाची वाटचाल ही सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कसे होईल?? शिंदे आणि अजितदादा भाजपकडून किती जागा खेचून घेऊ शकतील?? भाजप या दोन्ही नेत्यांना किती वाकवेल??, हे मुद्दे माध्यमांसाठी आणि ठाकरे + पवारांच्या प्रचारासाठी महत्त्वाचे असले, तरी भाजपच्या दृष्टीने दुय्यम आहेत. त्याऐवजी सामाजिक न्यायाच्या नावाखाली काँग्रेस + पवार आणि जरांगे यांनी तयार केलेला जाती वर्चस्वाचा अजेंडा मोडून काढायला भाजपची टॉप प्रायोरिटी आहे. परंपरागत जाती वर्चस्वाचे राजकारण चालणाऱ्या हरियाणात जातीचा अजेंडा तोडण्यात भाजप यशस्वी झाला. महाराष्ट्रात त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हरियाणातल्या विजयाच्या बळाचा उपयोग करून घेण्याची भाजपने तयारी चालवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App