विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis राजकारणात कधी न आवडणाऱ्या तडजोडी कराव्या लागतात लागतात. तशी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी तडजोड केली, अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Devendra Fadnavis confession about NCP
इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच अजित पवार यांच्या पक्षावर सर्वांत कठोर हल्लाबोल करत होते. कोट्यावधींच्या सिंचन घोटाळ्याला यात सहभागी केलं. भाजपच्या पक्क्या समर्थकांना हे पटलं नाही, म्हणून लोकसभेत ही परिस्थिती निर्माण झाली,यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यांना सोबत घेतलं, ते आमच्या मतदारांना आवडलं नाही, मी याच्याशी सहमत आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही भाजप कार्यकर्त्यांसमोर आणि मतदारांसमोर काही गोष्टी समोर आणल्या. ते कोणत्या परिस्थितीत आले, आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना सोबत घेतलं. आमच्या मतदारांच्या लक्षात आलंय की, राजकारण अनेकदा अशी परिस्थिती येते, ज्यावेळी तुम्हाला तडजोड कराव्या लागतात. काही तडजोड अशा असतात, ज्या लोकांना मनापासून आवडत नाहीत. पण त्या तुम्हाला कराव्या लागतात. त्याप्रकारच्या तडजोड आम्ही केल्या आहेत. आम्ही असा निर्णय का घेतला, याबाबत आम्ही 80 % लोकांना पटवून सांगितलं आहे.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना झटका; १५ दिवसांचा कारावास, २५ हजारांचा दंड
देवेंद फडणवीस काय म्हणाले?
जागावाटपात कमी जागा मिळाल्या तर आमच्याबद्दल काय विचार केला जाईल? असा मायना असतो. परंतु अशावेळी प्रॅक्टिकल विचार करावा लागेल, केवळ नंबर्सवर जाण्याची आवश्यकता नाही. विनेबिलीट महत्त्वाची गोष्ट असते. ज्यावेळी तीन पक्ष युतीत एकत्र येतात, त्यावेळी विनेबिलिटी आणि परसेप्शन्सबद्दल विचार केला जातो. अशावेळी परसेप्शन्सवर कमी आणि विनेबिलिटीवर जास्त काम करावं लागतं. आम्ही तिन्ही पक्षांच्या अपेक्षांचा विचार करून जवळपास 80 % जागावाटप केलेलं आहे. कोण कोणती जागा लढणार? हे ठरलेलं आहे. उरलेल्या 20 % जागांबद्दल आमची अजूनही चर्चा सुरू आहे.
शिंदेंच्या स्ट्राईक रेटबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी आम्हालाच सर्वाधिक मतं मिळालेली आहे. स्ट्राईक रेटला काहीही अर्थ नसतो. कुणी एका चेंडूत 4 धावा करून बाद झाला तर त्याचाही स्ट्राईक रेट वाढू शकतो. महाराष्ट्रात नंबर पार्टी केवळ भाजप आहे. शिवसेनेच्या वोटरचा आमच्याकडे ट्रान्सफर झाला, अजितदादांचा मतदार आमच्याकडे आला नाही. पण आता विधानसभा निवडणूक मध्ये एकमेकांची मते एकमेकांना ट्रान्सफर होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App