RSS : संघाच्या व्यापक धोरणात्मक निर्णयांमध्ये महिलांचा मोठा सहभाग, मुला – मुलींच्या एकत्र शाखेबद्दलही विचार शक्य!!

RSS संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी केली भूमिका स्पष्ट 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट राष्ट्र निर्माणाचे आहे. त्यामुळे त्यासंदर्भातल्या सर्व धोरणांच्या निश्चितीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहेच. स्वयंसेवकांचा याबाबतीतला विचार समाजाच्या दोन पावले पुढेच आहे, असे प्रतिपादन संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी केले. समाजातून मागणी आली, तर संघात मुला – मुलींची एकत्र शाखा देखील स्थानिक पातळीवर सुरू होऊ शकते, असे ते म्हणाले. RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये मुली, तरुणी का नसतात??, असा प्रश्न संघाच्या नेत्यांना नेहमीच विचारला जातो. सुनील आंबेकर यांनी इंडिया टुडेच्या कन्क्लेमध्ये या मुद्द्यावर भाष्य केले.

 सुनील आंबेकर म्हणाले :

संघाचे मूळ उद्दिष्ट राष्ट्र निर्माण हे आहे आणि त्या संदर्भातल्या सर्व धोरणात्मक निर्णयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे राजकारणापासून समाजातल्या भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये स्वयंसेवक काम करतात, तिथे महिलांचा सहभाग हा अग्रभागीच असताना दिसतो कारण स्वयंसेवकांची धारणा तशी बनवली जाते. RSS

संघाच्या शाखांमध्ये मुलांसह मुलींनाही सहभागी व्हायचं असल्याची कुठलीही मागणी समाजातून आलेली नाही. मुले आणि मुली एकत्र शाखांमध्ये सहभागी होण्याबाबत कधी लोकांनी मागणी केली नाही. परंतु, समाजातून तशी मागणी आली तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. सामान्य जनता मुलांना व मुलींना शाखांमधील अभ्यासात, खेळात, व्यक्तिमत्तव विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास अनुकूल असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी योग्य पावलं उचलू. आम्ही संघ शाखांच्या संरचनेत बदल करू.


Narendra Modi : ‘हरियाणाचे हे प्रेम माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे’


संघाचे स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात, शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, मैदानी खेळ खेळतात, भारतात खेळले जाणारे जुने सांघिक, मैदानी खेळ खेळतात, पुस्तकं वाचतात, अध्यन करतात.

सामाजिक स्तरावर आरएसएसच्या शाखा केवळ मुलांसाठी, तरुणांसाठी आहेत. परंतु, आमची राष्ट्र सेविका समिती देखील आहे. ही संघाचीच महिला संघटना आहे. १९३० सालापासून ही संघटना संघाप्रमाणेच काम करत आहे. त्या संघटनेत महिला पदाधिकारी असतात त्यामुळे त्या संघटनेच्या सर्वोच्च पदी महिलाच असेल तिथे पुरुष असण्याचे कारण नाही. त्याचबरोबर संघाच्या प्रमुख पदावर महिला असण्याचे कारण नाही.

एखाद्या भागातील लोकांनी मागणी केली की मुली देखील मुलांबरोबर शाखेत सहभागी होऊ इच्छितात, तर आम्ही आमच्या शाखेच्या संरचनेत नक्कीच बदल करू. परंतु, आजवर अशी कुठलीही मागणी समोर आली नाही. समाजातून आजवर बदलाची मागणी आली नाही. त्यामुळे शाखेत मुली सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. RSS

पूर्वी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती, मात्र आता भाजप स्वयंपूर्ण झाला आहे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. त्यावरही आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेकर यांनी याला फॅमिली मॅटर’ (कौटुंबिक वाद) म्हटलं आहे. ते म्हणाले, आम्ही कौटुंबिक वाद कुटंबातच सोडवतो. सार्वजनिक मंचांवर अशा विषयांवर चर्चा करत नाही!!

RSS Greater involvement of women in the wider strategic decisions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात