विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज सायंकाळी 5.00 वाजता उपोषण सोडले. तत्पूर्वी काल मध्यरात्री 12.00 वाजता अचानक त्यांना शरद पवारांचे समर्थक आमदार राजेश टोपे भेटून गेले. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी भाजपच्या “माधव पॅटर्न”वर जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांना जातीवादी म्हणता, मग तुमचा “माधव पॅटर्न” जातीवादी नव्हता का??, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित करून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वावर शरसंधान साधले. त्यांनी अप्रत्यक्षपणे ओबीसी समाजातल्या सत्ता सहभागावर आक्षेप नोंदविला.
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 9 दिवसांपासून सुरु केलेले उपोषण अखेर स्थगित केले. यावेळी त्यांनी राज्यात गाजलेल्या “माधव पॅटर्न”वरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “माधव पॅटर्न” हा जातीवाद नव्हता का??,असा सवाल करून त्यांनी महाराष्ट्रात ओबीसी समाजाला सत्तेत सहभागी करून घेणे आक्षेपार्ह ठरविले.
“माधव पॅटर्न” जातीवाद नव्हता का?
आपल्या जातीला चांगलं शिकविणारा कुणी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तू आंदोलन संपू दे तुझा जातीयवाद संपवतो. मी जातीयवादी मग “माधव पॅटर्न” आणला तो जातीयवादी नव्हता का?? असा सवाल त्यांनी केला. जातीवाद वाढू नये जेवढी जबाबदारी मराठ्यांची तेवढी त्यांची पण आहे. फडणवीसांना वाटत असेल खड्डे भरुन निघेल, भरून निघणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडामधील मराठे एकच आहेत. फडणवीसांनी मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमच्या सोबत दगा फटका करू नका. आचारसंहिता लागेपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून न जाण्याचे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. तुम्ही माझ्या पाठीशी आहेत मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आपल्या मुलांचा अपमान करू नका. जातीचा अपमान करू नका. कोणी पक्ष किंवा कोणी नेते आपले नाहीत, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App