Atishis : ‘माझं अभिनंदन करू नका, आज मी खूप दुःखी आहे…’,

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आतिशींची पहिली प्रतिक्रिया


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीला आज नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. आप आमदारांच्या बैठकीत आतिशी  ( Atishis  ) यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आतिशी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे कोणी अभिनंदन करू नये. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हा खेदजनक क्षण आहे.



त्या म्हणाल्या, “माझे गुरू अरविंद केजरीवाल यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली आहे. हे फक्त आम आदमी पक्षातच होऊ शकते. मी एका सामान्य कुटुंबातून आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी मला आमदार केले आणि नंतर मंत्री बनवले. त्यानंतर त्यांनी मला दिल्लीचा मुख्यमंत्री बनवले.

केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी सरकार चालवीन, असे आतिशी म्हणाल्या. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे. त्यांना अबकारी प्रकरणात अडकवण्यासाठी भाजपने ईडी-सीबीआयचा वापर केला. दिल्लीतील जनतेला अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. दिल्लीत लवकरच निवडणुका होणार आहेत आणि जनता केजरीवाल यांना पुन्हा निवडून देतील.

Atishis first reaction after being elected as Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात