Atishi Marlena : अतिशींचे आई-वडील उतरले होते अफजल गुरूच्या समर्थनात; “मार्लेना” हे देखील आडनाव खरे नाही!!

Atishi Marlena

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यातल्या आरोपांमुळे पायउतार झाले. किंबहुना त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर घराणेशाहीचा आरोप आपल्यावर लादला जाऊ नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची अतिशी मार्लेना त
यांच्याकडे सोपविली. त्यानंतर आतिशी मार्लेना नेमक्या कोण??, त्यांची संपत्ती किती??, त्यांच्याकडे स्वतःचे घर कसे नाही??, वगैरे बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण अतिशी मार्लेना अतिशय समृद्ध परिवारातून समोर आल्या आहेत ही वस्तुस्थिती दडवली गेली. Atishi Marlena New Cm surname

अतिशी मार्लेना या विजय सिंह आणि तृप्ता सिंह या प्राध्यापक दाम्पत्याची मुलगी आहेत. हे तेच प्राध्यापक दांपत्य आहे, ज्यांनी संसदेवरील हल्ल्यातील दहशतवादी अफजल गुरु याच्या बचावासाठी जंग जंग पछाडले होते. अफजल गुरूला देशातले सिस्टीमने बळीचा बकरा बनविले. त्याला फाशी देता कामा नये, अशा अर्जांच्या भेंडोळ्या विजय सिंह आणि तृप्ता सिंह या दांपत्याने कनिष्ठ कोर्टापासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत आणि राष्ट्रपतींपर्यंत धाडल्या होत्या.

अतिशींचे “मार्लेना” ही आडनाव देखील खरे नाही. ते जोड काम केलेले आडनाव आहे. प्राध्यापक विजय सिंह यांच्यावर मार्क्स आणि लेनिन यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ती दोन नावे एकत्र करून अतिशी यांनी स्वतःच्या नावापुढे “मार्लेना” जोडले. सुरुवातीला ते आपले आडनाव असल्याचे त्यांनी भासविले, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्यावर ख्रिश्चन असल्याचा ठपका बसू नये या भीतीपोटी त्यांनी “मार्लेना” हे नाव काढून टाकले.

आतिशींनी दिल्ली युनिव्हर्सिटी बरोबरच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. परदेशापासून ते देशातल्या विविध सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आहे. त्यातूनच त्या वेगवेगळ्या फंडिंग करणाऱ्या परदेशी एनजीओसी जोडल्या गेल्या. नंतर त्या अरविंद केजरीवालांच्या संपर्कात आल्या. त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश करून दिल्लीच्या राजकारणात बस्तान बसविले.

Atishi Marlena New Cm Delhi surname

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात