Sujit Kumar : BJDचे माजी राज्यसभा सदस्य सुजित कुमार यांचा भाजपमध्ये प्रवेश

Sujit Kumar

बीजेडीने शुक्रवारी पक्षविरोधी कारवायांसाठी कुमार यांची हकालपट्टी केली होती.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिजू जनता दलाचे (बीजेडी) माजी राज्यसभा सदस्य सुजित कुमार (  Sujit Kumar ) यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बीजेडीने शुक्रवारी पक्षविरोधी कारवायांसाठी कुमार यांची हकालपट्टी केली होती.

सुजित कुमार यांनी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.



बीजेडीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, पक्षविरोधी कारवायांमुळे कुमार यांची बीजेडीतून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “ज्या पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले त्याच पक्षाची त्यांनी निराशा केली आहे.

तसेच त्यांनी कालाहंडी जिल्ह्यातील लोकांच्या आशा आणि आकांक्षाही धुळीस मिळवल्या आहेत. दरम्यान, कुमार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.

Former Rajya Sabha member of BJD Sujit Kumar joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात