विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मागच्या 24 तासांपासून मराठवाडा (Marathwada ) व विदर्भासह राज्यातील काही विभागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापुरात अवघ्या 7 तासांत 1 इंच पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील 26 मंडळांत अतिवृष्टी झाली. शनिवार ते रविवार या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 56 मिमी पावसाची नोंद झाली, तर हिंगोलीत पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने 25 कुटुंबांमधील 200 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नांदेडच्या विष्णुपुरीचा एक दरवाजा उघडला आहे. बीडमध्ये बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. पुराच्या शक्यतेने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात महागाव तालुक्यात (जि. यवतमाळ) शनिवार रात्रीपासून ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाड्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतपिके आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील कानगावजवळील चानकी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने पूल खचला. त्यात दोन जण वाहून गेली. शनिवारी रात्री ही घटना घडली. यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांत 81.60 मिमी पावसाची नोंद झाली. 53 मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात 114 नागरिकांना स्थलांतरित केले. पुरामुळे आठ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद होते.
राज्यात सोमवारी (दि. २) अमरावती जिल्ह्याला रेड, छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्याला ऑरंेज, तर ठाणे व पालघर वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट कुलाबा वेधशाळेने दिला. रविवारी परभणी येथे ९४, बीड ४६, वाशिम ३१, तर सोलापूर येथे २१ मिमी पाऊस झाला. सोमवारी मराठवाड्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विशेषत: नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App