Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या जयंतीदिनीच तेलंगणात उफाळला पुतळा उभारण्याचा आणि उखडण्याचा वाद!!

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी काल पुतळा उभारण्याचा आणि उखडण्याचा वाद तेलंगणात उफाळला. तेलंगणाच्या सेक्रेटरीएट समोर राजीव गांधींचा पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली, तर तो पुतळा चार वर्षानंतर उखडण्याची घोषणा तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटीआर रामा राव यांनी केली. राजीव गांधींच्या जयंतीदिनी दोन प्रमुख नेत्यांमध्ये हा वाद उफाळला. Politics irrupt over rajiv Gandhi statue in telangana

तेलंगणात गेल्याच वर्षी विधानसभा निवडणूक होऊन के. चंद्रशेखर राव यांची सत्ता गेली. त्यांच्या जागी काँग्रेसची सत्ता आली. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री बनले. त्यांनी तेलंगणात सर्वत्र गांधी परिवार आणि काँग्रेसची छाप उमटवायला सुरुवात केली. यातूनच रेवंत रेड्डी यांनी तेलंगण सेक्रेटरीएट समोर मोक्याच्या जागेवर राजीव गांधींचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. तेलंगणात आधीच राजीव गांधींच्या नावाने स्टेडियम आणि युनिव्हर्सिटी आहेत. त्यापुढे जाऊन सेक्रेटरीएट समोर राजीव गांधींचा पुतळा उभारण्याचा मानस रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला.


 केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले तीन तलाक घातक, मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत


मात्र, रेवंत रेड्डी यांच्या घोषणेला चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामा राव यांनी ठाम विरोध केला. तेलंगण सेक्रेटरीएट समोर तेलंगण मातेचा पुतळा उभारला पाहिजे. कारण ती तेलंगणची अस्मिता आहे. राजीव गांधी यांच्या नावाने तेलंगणात आधीच स्टेडियम आणि युनिव्हर्सिटी आहेत. त्यामुळे रेवंत रेड्डी सरकारने राजीव गांधी यांचा पुतळा उभारला, तरी आम्ही 4 वर्षांनी तो पुतळा तिथून सन्मानपूर्वक हटवू आणि तिथे तेलंगण मातेचा पुतळा उभारू, असे के. टी. रामा राव यांनी जाहीर केले.

इतकेच काय, पण गांधी परिवाराच्या वर्चस्वासाठी काँग्रेसने पुतळ्याचे राजकारण केले, तर आम्ही म्हणजे भारत राष्ट्र समिती सत्तेवर आल्यावर राजीव गांधींची नावे हटवून स्टेडियम आणि युनिव्हर्सिटीला तेलंगणाच्या हिरोंची नावे देऊ, असा इशारा के. टी. रामा राव यांनी दिला.

Politics irrupt over Rajiv Gandhi statue in telangana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात