शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बांगलादेशने ( Bangladesh) अमेरिका, रशिया, जपान, सौदी अरेबियासह 7 देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे. यामध्ये अमेरिकेतील राजदूत मोहम्मद इम्रान, रशियातील राजदूत कमरूल हसन, सौदी अरेबियातील राजदूत जावेद पटवारी, जपानमधील राजदूत शहाबुद्दीन अहमद, जर्मनीतील राजदूत मोशर्रफ हुसैन भुईया, युएईमधील राजदूत अबू जफर आणि मालदीवमधील उच्चायुक्त रिअर ॲडमिरल एसएम अबुल कलाम आझाद यांचा समावेश आहे.
शेख हसीना यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यापूर्वी आणि नंतर आंदोलकांच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे एक पथक पुढील आठवड्यात बांगलादेशला भेट देणार आहे. गुरुवारी ही घोषणा करण्यात आली.
8 ऑगस्ट रोजी, शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर काही दिवसांनी, मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. यापूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता आणि हिंसक निदर्शनांदरम्यान 5 ऑगस्ट रोजी भारतात निघून आल्या होत्या.
बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागाराने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जुलैमध्ये आणि या महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र पुढील आठवड्यात तथ्य शोध पथक पाठवत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App