नुकतीच केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली गेली होती. CBI filed charge sheet in Delhi liquor policy scam accused Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
तपास यंत्रणेचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये आम आदमी पार्टीआणि त्याचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.
AAP चा दावा- केजरीवाल यांची साखरेची पातळी 50 वर घसरली, प्रकृती चिंताजनक, 30 जुलैला रॅली
आरोपपत्रात केजरीवाल यांचे नाव मद्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. आम आदमी पार्टीने 100 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वी 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ED प्रकरणात अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, CBIने अटक केल्याने ते तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत.
नुकतीच, दिल्ली न्यायालयाने कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App