वृत्तसंस्था
कीव्ह : रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असून 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन न्यूज चॅनल सीएनएननुसार, सोमवारी कीवमध्ये हा हल्ला झाला. यानंतर 600 हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यात आले. Russian airstrike on Ukraine’s children’s hospital; 41 killed, over 170 injured
हल्ल्यानंतर काही वेळातच रुग्णालयाची इमारत कोसळली. पोलिसांनी सांगितले की, 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रुग्णालयात गर्दी असताना हा हल्ला करण्यात आला.
या घटनेवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी, झेलेन्स्की यांनी बदला घेण्यासाठी देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलावली होती.
बचाव पथक आणि स्थानिक लोक ढिगारा हटवून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या माहितीनुसार अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. हा हल्ला इतका मोठा होता की जवळपासच्या १०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की त्यांनी 38 पैकी 30 रशियन क्षेपणास्त्रे पाडली आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यांमध्ये डनिप्रो, क्रिव्ही रिह, स्लोव्हियान्स्क आणि क्रॅमतोर्स्क या शहरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
3 दिवसांपूर्वी 55 वेळा हवाई हल्ला
रशियाने गेल्या 24 तासांत शुक्रवार आणि शनिवारी युक्रेनवर 55 हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 43 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशियन न्यूज एजन्सी आरआयएने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनमधील वेगवेगळ्या ठिकाणी 6 रॉकेट आणि 70 पेक्षा जास्त ग्लाईड बॉम्बने हल्ले केले.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्य रात्रभर अधूनमधून हल्ले करत आहेत. त्यांनी उत्तर युक्रेनमधील पॉवर प्लांटवर हल्ला केला, 1 लाखाहून अधिक लोक वीजविना राहिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App