विशेष प्रतिनिधी
नांदेड : सरकारने मराठ्यांशी दगा फटका करू नये. अन्यथा मी आता यापुढे नाव घेऊन कोणाला पाडायचे ते सांगेन. निवडून आलेल्या नेत्यांनीही मस्तीत येऊ नये, सभागृहात समाजाची बाजू मांडावी. आता सरकारने आरक्षण दिले नाही तर मुंबईला आलो तर माघारी परतणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यावेळी दिला.If the government makes a big fuss, we will fight by name in the election, Jarange Patal warns
नांदेड येथे शांतता रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, काही जण बोगस आरक्षण खाऊन आमच्या नोंदी सरकारी दरबारी सापडूनही आम्हाला विरोध करत आहेत. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असताना आम्ही जातीयवादी कसे? तुमचे एखाद-दोन ओबीसी नेते पाडले तर तुम्हाला वेदना होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी मराठ्यांच्या वेदना कोण समजून घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने आणि विरोधकांनी मला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. पण मराठा समाजाने मला उघडे पडू दिल नाही. मी तुमच्या ताकदीचा गैरफायदा घेतला नाही. मी इमानदारीने समाजाच्या खांद्यावर अखेरचा श्वास घेईन पण गद्दारीचा शिक्का घेऊन मरणार नाही. लाख मेले तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी म्हण आहे. पण माझ्या बाबतीत ही म्हण मी बदलली आहे. एक मेला तरी चालेल पण कोटी जगले पाहिजेत, असे ते म्हणाले.
बाहेर गावातून आलेल्या मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी जेवण, अल्पोपाहार व पाणी बाटल्यांच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनीही अल्पोपाहार व पाण्याची व्यवस्था केली होती. दलित व मुस्लिम बांधवाकडून यावेळी रॅलीचे स्वागत करण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील ५० गावातून ५० हजार भाकरी घरोघरी तयार करुन रॅलीत आणल्या होत्या. भाकरीसोबत ठेचा, भाजी वाटण्यात आली.
एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत, जेसीबींनी भलेमोठे हार व फुलांची उधळण करत नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर जरांगे यांनी संवाद साधला.
छगन भुजबळ यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत. मोजक्या ओबीसी नेत्यांना हाताशी धरून तुमचा अख्खा महाराष्ट्र हातून जात आहे. हे फडणवीस यांनी समजून घ्यावे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरा चंद्रकांत पाटील यांना अधिसूचना वाचायला सांगा, असे म्हणत फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी टीका केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App