लवकरच चंपाई सोरेन आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवू शकतात Hemant Soren will be the Chief Minister of Jharkhand again elected as the leader of the legislature party
विशेष प्रतिनिधी
रांची : हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. असे मानले जात आहे की लवकरच चंपाई सोरेन आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवू शकतात. यानंतर I.N.D.I.A आघाडीकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.
हेमंत सोरेन यांचे निवासस्थान सोडताना इंडिया आघाडीचे सहकारी काँग्रेस आमदार इरफान अन्सारी म्हणाले की, हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री असतील. हेमंत सोरेन यांना ३१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. अटक होण्यापूर्वी सोरेन यांनी राजभवनात जाऊन राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेत होते. मात्र, त्यांचा अनुभव पाहता कल्पना सोरेन यांच्या जागी चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवण्यात आली. चंपाई सोरेन यांना ‘झारखंड टायगर’ म्हणून ओळखले जाते.
हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 28 जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना नियमित जामीन मंजूर केला, त्यानंतर त्याच दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. आता त्यांची सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील. 2019 च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांनी दुमका आणि बरहेत या दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या. यानंतर JMM, काँग्रेस आणि RJD यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने त्यांना मुख्यमंत्री केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App