राहुल गांधींच्या हिंदू विरोधी भाषणाने सत्ताधारी NDA मध्ये लावले फेव्हिकॉल!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी काल आपल्या पहिल्याच भाषणात लोकसभेत फुल्ल बॅटिंग करायला गेले पण भरपूर खोटं बोलून बसले. इतकेच नाही तर, त्यांनी जे हिंदू विरोधी भाषण केले, त्यातून त्यांनी सत्ताधारी NDA आघाडीत फेव्हिकॉल लावण्याचेच काम केले. Rahul Gandhi’s anti hindu speech in loksabha brings NDA together

कारण राहुल गांधींच्या कालच्या भाषणानंतर आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA संसदीय पक्षांची बैठक घेऊन त्यातून फेव्हिकॉलचा मजबूत जोड है, टुटेगा नही!!, असा राजकीय संदेश दिला. NDA मधल्या सगळ्या घटक पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एका कुटुंबांसारखे एकत्र काम करण्याचा संदेश दिला.

राहुल गांधींच्या कालच्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्ताधारी NDA आघाडी अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली. ती त्यांनी आज पुरेपूर घेतली. एरवी कुठल्याही संसदीय पक्षाची बैठक अधिवेशन सुरू होताना घेतली जाते. तशी बैठक मोदींनी घेतली होतीच, पण राहुल गांधींच्या कालच्या भाषणानंतर संपूर्ण देशभरामध्ये सत्ताधारी NDA आघाडी एकजुटीने उभी आहे, असा संदेश जावा म्हणून मोदींनी आज पुन्हा एकदा NDA आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत ऐक्याचा सूर आळवण्याबरोबरच राहुल गांधींच्या कालच्या हिंदू विरोधी भाषणाच्या निषेधारचा सूरही उमटला.

एरवी हिंदू शब्दावर राजकारण न करणारे तेलगू देशम, लोक जनशक्ती पार्टी, भारतीय लोकदल, धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासारखे पक्ष देखील भाजपच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले दिसले. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या हिंदू विरोधी भाषणाचा एकमुखाने निषेध केला. यामध्ये लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, शांभवी चौधरी, भारतीय लोक दलाचे जयंत चौधरी, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमार स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांनी राहुल गांधींचे हिंदू विरोधी भाषण ठोकून काढले.

विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी लोकसभेतल्या पहिल्याच भाषणात फुल्ल बॅटिंग करायला गेले. पण घडले उलटेच!! त्यांच्या एका हिंदू विरोधी भाषणाने हिंदुत्वाचे राजकारण न करणाऱ्या पक्षांना देखील भाजपच्या बाजूने ढकलून दिले. राहुल गांधींच्या बाजूने लोकसभेत फक्त समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव बोलत राहिले, पण बाकीच्या विरोधी नेत्यांचा सूर मवाळच राहिला.

Rahul Gandhi’s anti hindu speech in loksabha brings NDA together

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात