केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचं विधान ; राज्य सरकारने सामाजिक बांधिलकी जपणारा अर्थसंकल्प मांडल्याचेही म्हणाले.
विशेष प्रतनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी कामगार महिला गरीब बहुजन दलित आदिवासी सर्व वर्गाला सर्व सामाजिक घटकांना न्याय देणारा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा अर्थसंकल्प आहे. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Union Minister Ramdas Athawale praised the state governments budget and Devendra Fadnavis
याशिवाय, महाराष्ट्र सरकारकडून जे आर्थिक बजेट सादर केलं ते सगळ्यांसाठीचं बजेट आहे. हा आहे जून महिना, मजबूत होणार आता महाराष्ट्रच्या मैना मैना म्हणजे राज्याच्या मुली. येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत राज्यात RPI ला एक मंत्रिपद मिळावं, येणाऱ्या विधानपरिषद मध्ये एक जागा द्यावी, तर तीन मंडळाचे चेअरमन पद RPI पक्षाला द्यावं ही मागणी पक्षाकडून केली जात आहे.’ असंही आठवलेंनी बोलून दाखवलं आहे.
याचबरोबर ‘देवेंद्र फडणवीस यांना याबाबत चर्चा करणार आहोत, अजित पवार शिंदे यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू. लोकसभा निवडणुकीत आम्ही RPI कार्यकर्त्यांनी मन लावून काम केला आहे १७ जागा निवडून आणण्यात RPI चा वाटा होता. येणाऱ्या विधानसभा मध्ये 8-10 जागा हा आमच्या पक्षाला मिळाव्यात. चादर हमारी फटने वाली नही है और देवेंद्र फडणवीस हटणे वाले नही है.’ असं रामदास आठवलेंनी म्हटलेलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App