अपात्र ठरवण्याची करण्यात आली आहे मागणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (२५ जून) लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने घोषणाबाजी करत ‘जय पॅलेस्टाईन’ म्हटले. यावरून बराच वाद झाला असून हे प्रकरण त्यांचे लोकसभा सदस्यत्व जाण्याची शक्यता निर्माण होणयापर्यंत पोहोचले आहे. ओवेसी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे.Asaduddin Owaisis membership of Parliament may be canceled Complaint to the President in the case of Jai Palestine declaration
हैदराबादमधून पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय फिलिस्तीन’च्या घोषणा दिल्या. ओवेसींच्या या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यानंतर सभापतींनी ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. प्रोटेम स्पीकर भृतहरी महताब म्हणाले की, असदुद्दीन ओवेसी यांच्या शपथेचा मूळ मजकूर रेकॉर्डमध्ये नोंदवला जात आहे.
त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी मंगळवारी रात्री सांगितले की, एआयएमआयएम खासदार ओवेसी यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओवेसी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हरि शंकर जैन यांनी राष्ट्रपतींसमोर असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ आणि १०३ नुसार तक्रार दाखल केली असून, त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात यावे अशा मागणी केली आहे. याबाबत ट्वीटद्वारे माहिती देण्यात आली आहे.
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले बचावात?
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही शपथविधीदरम्यान झालेल्या घोषणाबाजीबाबत आपली बाजू मांडली. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, मी सभागृहात ‘जय फिलिस्तीन’ म्हटले होते.
ते पुढे म्हणाले, “इतर सदस्यांनीही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय फिलिस्तीन म्हणालो. हे चुकीचे कसे असू शकते. मला संविधानातील तरतुदी सांगा? इतरांनीही काय म्हटले आहे. काय फिलिस्तीनबद्दल महात्मा गांधींनी सांगितले ते वाचले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App