विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येऊनही लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थताच वेगवेगळ्या प्रकारे रोज समोर येते. अशाच अस्वस्थतेतून अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांबरोबर जावे, असा “सल्ला” अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सकाळी दिला. पण सायंकाळ होता – होता, अजित पवारांचा महायुतीत सन्मान राखला जात आहे, असा “साक्षात्कार” त्यांना झाला. त्यामुळे मिटकरींनी सायंकाळी घुमजाव करत अजित पवारांनी महायुती बरोबरच राहावे असा “फेरसल्ला” दिला. Amol mitkari back tracked his morning statement of ajit pawar to leave mahayuti
अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जावे असा वैयक्तिक सल्ला अमोल मिटकरींनी दिला होता. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे राजकारण बदलवून शकतील, असा दावाही मिटकरी यांनी व्यक्त केला होता.
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावे, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करावा. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील. दोन्ही नेत्यांमध्ये दुवा होण्याची संधी मिळाल्यास स्वत:ला भाग्यवान समजेन.
अमोल मिटकरी म्हणाले, कोणीही यावे काही बोलून जावे हे खपवून घेतले जाणार नाही. महायुतीत अजित पवारांनी राहू नये असे यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. स्वत:हून अजित पवारांनी बाहेर पडावे यासाठी मानसिक त्रास दिला जात आहे. अशा पद्धतीने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही, असेही मिटकरी म्हणाले होते.
मात्र सायंकाळ होता – होता अशी काही चक्रे फिरली की अमोल मिटकरी यांना अजित पवारांचा महायुतीत सन्मान होत असल्याचा “साक्षात्कार” झाला. त्यांनी आपले वक्तव्य बदलले. अजित पवारांनी महायुतीमध्येच राहावे. त्यांना महायुतीच्या नेत्यांनी सन्मान दिला आहे. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत जागा दिल्या आहेत, असे अमोल मिटकरी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांनी आपले वक्तव्य तोडून मोडून दाखवले, असा दावा केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App