Modi 3.0 : मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा, कामाचा वेग बदलण्याची शक्यता नाही!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बहुमताच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरकार चालवावे लागणार आहे. त्यामुळे काही विशिष्ट तडजोडी करावी लागतील. चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देशम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष यांच्या नाकदूऱ्या काढाव्या लागतील. त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलेल, अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या होत्या. प्रत्यक्षात या अटकळी खऱ्या ठरल्या नाहीत. No major reshuffle appears in Modi 3.0 cabinet

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी बोलविलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीकडे नुसती नजर टाकली, तरी मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा खातेवाटप आणि कामाचा वेग बदलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही खाते वाटपात एखाद दुसरे खाते इकडे – तिकडे यापलीकडे फारसा बदल संभवत नाही.

कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सात लोक कल्याण मार्ग येथे संभाव्य मंत्र्यांना बोलवून त्यांच्या समवेत बातचीत केली आणि चहापान केले. यामध्ये पहिल्या रांगेत बसलेल्या मंत्र्यांची नावे लक्षात घेतली, तर मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सर्वांत ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह हे पहिल्या रांगेत होतेच, पण त्यांच्याबरोबर जदयुचे नेते लल्लनसिंग, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी. कुमारस्वामी त्याचबरोबर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा देखील पहिल्या रांगेत बसणाऱ्यांमध्ये समावेश होता. बाकी निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर यांनी आपली पहिली रांग टिकवली होती. अर्थातच मोदी मंत्रिमंडळातले सर्वांत महत्त्वाचे मंत्री पहिल्या रांगेत बसले होते.

या सगळ्यात महत्त्वाची खाती, ज्यांचा “कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्स” मध्ये समावेश होतो, ती खाती म्हणजे गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र या सगळी ही सगळी मंत्रालय भाजपचे वरिष्ठ नेते सांभाळतील. किंबहुना एखाद दुसरा फेरबदल वगळता मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील बदल करता येणार करता होणार नसल्याची दाट शक्यता बोलून दाखविली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री पदी अमित शाह, संरक्षण मंत्रीपदी राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्रीपदी एस. जयशंकर अर्थमंत्रीपदी निर्मला सीतारामन कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातल्या एखाद दुसऱ्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदी बदल करू शकतात.

ज्यार्थी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्स मधली खाती भाजपच्याच वरिष्ठ मंत्र्यांकडे राहणार आहेत आणि त्यातही जुनेच मंत्री कायम राहण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता प्रत्यक्ष कामाच्या वेगात आणि धोरणांमध्ये फार बदल होण्याची शक्यता नाही. उलट पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे कामांमध्ये अधिक वेग येण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांना देखील महत्त्वाचीच खाती मिळण्याची शक्यता आहे.

No major reshuffle appears in Modi 3.0 cabinet

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात