हुथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्रांच्या 9 जणांचे केले अपहरण; कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही समावेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : येमेनमधील हुथी बंडखोरांनी यूएन एजन्सीशी संबंधित किमान 9 लोकांचे अपहरण केले आहे. अपहरण करण्यात आलेल्या लोकांमध्ये यूएन मानवाधिकार एजन्सी, वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि यूएन स्पेशल ॲम्बेसेडरच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. याशिवाय एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीचेही अपहरण करण्यात आले आहे.Houthi Rebels Kidnap 9 UN Officials; Including employee’s wife

न्यूज एजन्सी एपीनुसार, यूएन एजन्सीशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. युएनच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला अपहरण झालेल्या लोकांची पुष्टी केली आहे. सध्या यूएनने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.



वृत्तानुसार, अमेरिकन आणि इतर देशांच्या हवाई हल्ल्यांमुळे हुथी बंडखोर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी हुथी बंडखोरांनी येमेनमध्ये 44 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

येमेनचे इराण समर्थक हुथी बंडखोर लाल समुद्र आणि हिंदी महासागरात अमेरिकेच्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. असे करून ते गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणत आहेत. हे हल्ले टाळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून जगभरातील व्यापारी जहाजे लाल समुद्राऐवजी आफ्रिकेतून जात आहेत.

हुथी बंडखोरांना इस्रायलला लक्ष्य करायचे आहे

गेल्या महिन्यात, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात आणि आसपास 100 हून अधिक हल्ले केले आहेत. फेब्रुवारीमध्ये, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे अपहरण केले. हे जहाज तुर्कीहून भारतात येत होते. हुथी बंडखोरांनी ते इस्रायली जहाज समजून अपहरण केले होते.

या घटनेपूर्वी हुथी गटाने इस्रायली जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितले होते की इस्रायलच्या वतीने जाणाऱ्या सर्व जहाजांना लक्ष्य केले जाईल.

Houthi Rebels Kidnap 9 UN Officials; Including employee’s wife

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात