विशेष प्रतिनिधी
पुणे : हिट अँड रन प्रकरणातील मद्यधुंद मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवाल याने त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासाठी अग्रवालने ससूनचे डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना मोठी रक्कम दिल्याचे समोर आले आहे. पबमधील पार्टीत यथेच्छ दारू ढोसल्यानंतर मुलाने 160 किमीच्या सुसाट वेगाने पोर्शे कार चालवून दोन तरुण आयटी प्रोफेशनल्सना चिरडले होते. त्या वेळी त्या कारमध्ये त्याचे दोन अल्पवयीन मित्रही बसलेले होते. त्यांनीही मद्यप्राशन केले होते. परंतु फॉरेन्सिक चाचणीत त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोलचा अंश आढळून आला नाही त्यामुळे पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले असून आता याबाबतही चौकशी सुरू झाली आहे.In the Pune Porsche accident case, the father of the accused also changed the blood samples of two of the boy’s friends; Investigation started
18 मे रोजी अल्पवयीन आरोपीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने दहा ते बारा मित्रांसमवेत मुंढवा येथील कोझी हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान टेबल क्रमांक 15 वर पार्टी केली. त्यावेळी त्यांनी कोझी चिकन ,स्पाइस चिकन हे खाद्यपदार्थ जेवण्यासाठी ऑर्डर केले. मात्र त्यासोबत जे.डब्ल्यू ,ब्लॅक लेबल अशी मद्य देखील ऑर्डर केली. तसेच नंतर मुलांनी 19 मे रोजी रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान मित्रांसोबत मेरियट संलग्न हॉटेल ब्लॅक मुंढवा येथे पुन्हा मद्य घेतल्यानंतर पोर्श कार ताशी 160 किमी भरधाव चालवून दोन जणांचा चिरडले. अपघातानंतर येरवडा पोलिसांनी गाडीमधील अल्पवयीन आरोपी त्याचे दोन साथीदार आणि कारचालक यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ससून रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी होऊन रक्ताचे नमुने घेण्यात आले.
मात्र ,बिल्डर विशाल अग्रवाल याने पैशांच्या जोरावर मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यांचे अहवाल डॉक्टरांसोबत मॅनेज केल्याने गाडीतील तिन्ही मुलांच्या रक्तात अल्कोहोल आढळले नाही. त्यामुळे केस कमकुवत झाली आहे.
मद्यधुंद मुलाऐवजी आईच्याच रक्ताचा नमुना घेतल्याचा संशय
मद्यधुंद दिवट्या चिरंजीवाला वाचवण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी एका महिलेचे रक्त नमुने घेतल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले असून ही महिला म्हणजे दिवट्या चिरंजीवाची आईच असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कचऱ्यातही फेकले नव्हते तर एका भलत्याच व्यक्तीला सोपवल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. आता या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. अल्पवयीन दिवट्या चिरंजीवाला वाचवण्यासाठी ससूनचे दोन डॉक्टर, एक शिपाई, त्याशिवाय तीन नर्स अशा एकूण पाच जणांनी मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता ससूनच्या शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांचीच चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलणारे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचा निलंबित डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांसह शिपाई अतुल घटकांबळे यांना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App