Pune Porsche Accident : ससूनच्या डॉक्टरांना फोन, ब्लड सॅम्पल बदलले, पुण्यातला आमदार पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवून बड्या बापाच्या बेट्याने दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. त्या बेट्याला वाचवण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्याचे ब्लड सॅम्पल बदलले. ओरिजनल ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकून दिले. मात्र ही सगळी लबाडी उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी पुण्यात ससूनच्या दोन्ही डॉक्टरांना अटक केली, पण मूळात पुण्यातल्या एका आमदाराचा डॉक्टरांना फोन आला. त्यामुळे ब्लड सॅम्पल बदलले गेले. ही बाब असा उघडकीस आली आहे त्यामुळे पुण्यातला आमदार पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.Pune Porsche Accident: Sassoon’s doctor phoned, blood sample changed, Pune MLA under suspicion again!!



पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने 17 मद्यधुंद अवस्थेत असताना पोर्शे कारने दोघांना चिरडले यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अजय तावरे याला रक्ताचा नमुना बदलण्यास पुण्यातील एका आमदाराचा फोन आल्याचे समोर आले आहे.

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हलनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे सॅम्पल मॅच झाले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल मॅच झाला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचा नमुना बदलण्यास डॉक्टर अजय तावरे याला पुण्यातील एका आमदाराचा फोन आला होता. या प्रकरणी आता पोलिस खोलात जाऊन तपास करणार आहेत. हे आमदार कोण आहेत व कोणी दबाव टाकला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

पण एकूणच अग्रवाल पवार अग्रवाल आमदार सुनील टिंगरे यांचे संबंध संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान या यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा फोन फॉरेन्सिक लॅब कडे तपासण्यासाठी पाठवण्याची मागणी केली आहे कारण त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केल्याचे त्यांनीच जाहीरपणे सांगितले होते.

पुण्यातील एक बडा नेता या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करत आहे, असे आरोप यापूर्वीदेखील करण्यात आले होते. वेगवेगळ्या पक्षांकडूनही असे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी एका आमदारानेच फोन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक खोलात जाऊन तपास करणार आहेत.

Pune Porsche Accident: Sassoon’s doctor phoned, blood sample changed, Pune MLA under suspicion again!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात