‘काँग्रेसचे पाकिस्तानवर प्रेम आहे, भारताच्या भागाला Pok बनवला’, अनुराग ठाकूरांचा निशाणा!

नरेंद्र मोदी लोकांच्या हिताचा विचार करतात, पण काँग्रेस फक्त स्वतःचा विचार करते.


विशेष प्रतिनिधी

हमीरपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना पाकिस्तानात नव्हे तर भारतात निवडणुका होत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे (काँग्रेस) पाकिस्तानवर प्रेम आहे, भारतावर नाही, असे ते म्हणाले.Congress loves Pakistan it created Pok from India Anurag Thakurs target

अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशात प्रश्न उपस्थित केला की, काँग्रेस पाकिस्तानचे कौतुक का करत आहे? यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. काँग्रेसचे भारतातील जनतेवर प्रेम नाही. यावेळी पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा त्यांनी केला.



अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघात शैक्षणिक क्रांती झाली आहे. आम्ही सातत्याने विकासकामे करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या हिताचा विचार करतात, पण काँग्रेस फक्त स्वतःचा विचार करते.

अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसने सतपालसिंग रायजादा यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील शिमला (राखीव), हमीरपूर, मंडी आणि कांगडा या चार जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.

Congress loves Pakistan it created Pok from India Anurag Thakurs target

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात