सावरकरांचा अपमान हा निवडणुकीचा मुद्दाच नाही, मोदींचे वक्तव्य चिथावणीखोर; पवारांनी टाळले आव्हान!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वीर सावरकरांचा अपमान 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दाच नाही त्यामुळे त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा आरोप करून शरद पवारांनी मोदींनी काल दिलेले आव्हान टाळले. Insulting Savarkar is not an election issue

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात कल्याण आणि मुंबईच्या सभेत शरद पवारांना वीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते तुम्ही महाविकास आघाडीचे बडे नेते आहात ना!!, मग राहुल गांधींच्या तोंडून तुम्ही वीर सावरकरांविषयी पाच चांगली वाक्ये बोलवून दाखवा, असे आव्हान नरेंद्र मोदींनी कल्याणच्या सभेत दिले होते. त्यानंतर कालच्या शिवाजी पार्कवरच्या सभेत त्यांनी त्या आव्हानाचे वेगळ्या पद्धतीने रिपीटेशन केले. काँग्रेस सतत सावरकरांचा अपमान करते. तुम्ही महाविकास आघाडीचे बडे नेते आहात ना… मी तुम्हाला आव्हान देतो, की तुम्ही राहुल गांधींकडून हे वक्तव्य करून घ्या, की ते जन्मभर सावरकरांचा कधीच अपमान करणार नाहीत. निवडणुकीपुरते पवारांनी राहुल गांधींच्या तोंडाला कुलूप लावले आहे, पण निवडणूक संपली की राहुल गांधी पुन्हा सावरकरांचा अपमान करायला सुरुवात करतील, असे मोदी म्हणाले होते.

महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी वीर सावरकरांचा अपमान हा या निवडणुकीतला मुद्दाच नाही, असे सांगून मोदींचे आव्हान टाळले. या पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

त्या पलीकडे जाऊन पवार म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान हा या निवडणुकीतला मुद्दाच नाही. राहुल गांधींनी संपूर्ण निवडणुकीत सावरकर मुद्द्यावर कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे मोदींचे वक्तव्य हे चिथावणी देणारे आहे. वास्तविक देशात धार्मिक, सामाजिक एकता टिकून राहावी अशी वक्तव्ये पंतप्रधान पदावर राहणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने केली पाहिजेत. परंतु दुर्दैवाने मोदी सामाजिक ऐक्य दुभंगणारी वक्तव्ये करतात, असा आरोप पवारांनी केला. मात्र सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा नाही, असे सांगून मोदींनी दिलेले मूळ आव्हान पवारांनी टाळले.

Insulting Savarkar is not an election issue

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात