पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल, म्हणाले- प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा लोकांना समजला​​​​​​​; MVA 35 हून जास्त जागा जिंकणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जनतेला प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा समजला. त्यामुळे यावेळी त्यांना 1 टक्का मते मिळतील की नाही याविषयी शंका आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32 ते 35 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील, असा दावाही केला.Prithviraj Chavan’s attack, said- People understood the true face of Prakash Ambedkar​​​​​​​​ MVA will win more than 35 seats



पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणूक, काँग्रेस व महाविकास आघाडीची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनीती तथा वंचित बहुजन आघाडी आदी वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले की, यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीमु्ळे महाविकास आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचाही दावा केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आमचे नुकसान केले. त्यात तथ्य आहे. पण यावेळी तसे होणार नाही. गत निवडमुकीत वंचित बहुजन आघाडीला 7 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी त्यांची एमआयएमशी आघाडी होती. त्यांना मिळालेल्या 7 टक्क्यांपैकी 3 ते साडेतीन टक्के मते कदाचित वंचितची असतील. पण यावेळी त्यांना ही साडेतीन टक्के मतेही मिळणार नाहीत.

कारण, लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना 1 टक्के मते मिळतील की नाही याविषयी साशंकता आहे. आम्ही महाविकास आघाडीत त्यांना 5 जागा देत होतो. या जागा त्यांच्यासाठी पुरेशा होत्या. पण त्यांनी त्या घेतल्या नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल

पृथ्वीराज चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा बदल जाणवत आहे. सद्यस्थितीत माझ्या आकलनानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील. कदाचित ही संख्या वाढूही शकेल. आम्ही या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार व संविधान बचाव या 5 मुद्यांवर जोर दिला. हे सर्व मुद्दे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिले आहेत. देशातील दलित समाज भाजपपासून दूर गेला आहे. भाजपच्या 400 जागा आल्या तर आपले संविधान बदलले जाईल हे दलितांच्या डोक्यात पक्के बसले आहे. संविधान धोक्यात आहे याची जाणिव त्यांना झाली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan’s attack, said- People understood the true face of Prakash Ambedkar​​​​​​​​ MVA will win more than 35 seats

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात