महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचे भाकीत करताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि महायुतीला 12 ते 13 जागा मिळू शकतील, असा दावा केला. मात्र, महायुतीला त्यांनी 12 – 13 जागा दिल्या??, किती उदार अंतःकरण साहेबांचं!!, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या भाकिताची खिल्ली उडवली. Devendra fadnavis targets sharad pawar over his poor predictions on mahayuti performance

महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार विरोधात खूप संतापाचे वातावरण आहे आणि महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 30 ते 35 जागा मिळतील, असे भाकित शरद पवारांनी वर्तविले. त्याचवेळी महायुतीला फक्त 12 ते 13 जागांवर आटोपते घ्यावे लागेल, असे ते म्हणाले.

पवारांच्या या भाकीतावरून देवेंद्र फडणवीस यांना पुणे विमानतळावर प्रश्न पत्रकारांनी प्रश्न विचारला. पवार साहेब म्हणतात, महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि महायुतीला फक्त 12-13 जागांवर समाधान मानावे लागेल. यावर तुमचे मत काय??, असे विचारताच फडणवीस उद्गारले, त्यांनी महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या?? किती उदार अंत:करण साहेबांचं!!, असं म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या भाकिताची खिल्ली उडवली.

पुणे लोकसभा मतदारसंघात विदर्भातल्या 10 काँग्रेस आमदारांनी तळ ठोकला आहे. ते रवींद्र धंगेकर यांचा प्रचार जोमाने करत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आपण 1 लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊ, असा दावा केला. त्यावर फडणवीस म्हणाले, काँग्रेस पुण्यामध्ये साम दाम दंड भेद असे सगळे प्रकार वापरणार असल्याची आमची माहिती आहे, पण त्याला प्रत्युत्तर देण्याची आमची तितकीच तयारी आहे. विकास ठाकरे जरी नागपुरातून 1 लाखाच्या फरकाने निवडून येण्याच्या बाता मारत असले, तरी प्रत्यक्षात नितीन गडकरी नागपुरातून त्यांच्यापेक्षा जास्तच मतांनी निवडून येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra fadnavis targets sharad pawar over his poor predictions on mahayuti performance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात