उघडा डोळे, बघा नीट!! : हिंदूंची लोकसंख्येत 7.8 % घट, मुस्लिम लोकसंख्येत 43.15 % वाढ!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतात. विशेषतः मुस्लिमांचे मॉब लिंचींग होते, असा नॅरेटिव्ह भारतातील लिबरल आणि पाश्चात्य जगातील माध्यमे सगळीकडे पसरवत असताना प्रत्यक्षात भारतातली वस्तुस्थिती आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालातून समोर आली आहे. In 1950-2015, Hindu population dipped from 85% to 78%, Muslims rose to 14% from 10%

त्यातून हिंदू, मुस्लिम तसेच अन्य धर्मीयांची लोकसंख्या किती वाढली आणि किती घटली??, याची डोळे उघडणारी किंबहुना डोळे विस्फारणारी आकडेवारी समोर आली आहे. 1950 ते 2015 या दीर्घ कालावधीमध्ये भारतात हिंदूंची लोकसंख्या तब्बल 7.8 % नी घटली, तर मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 % नी वाढली असे धक्कादायक वास्तव आर्थिक परिषदेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेने आता भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागच्या काही दशकांमध्ये भारतात लोकसंख्याशास्त्रीय दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत, ते या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत.

अहवालातील निरीक्षणे अशी :

  • 1950 ते 2015 या काळात भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत ७.८ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर त्याचेवळी आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये त्यांच्या देशातील प्रमुख धर्माच्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे.
  • हिंदूंबरोबरच जैन आणि पारशी समुदायांची लोकसंख्याघटत असतानाच मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख यांची वाढली आहे. 1950 ते 2015 या काळात मुस्लीम धर्मीय लोकसंख्येमध्ये तब्बल 43.16 % वाढ, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येत 5.38 % वाढ, शीख धर्मीय लोकसंख्येत 6.58 % वाढ झाल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट झाले आहे, तर बौद्ध धर्मीय लोकसंख्येत किंचित वाढ नोंदविली गेली आहे.
  • भारताच्या एकूण लोकसंख्येत 1950 मध्ये 84 % हिंदू होते. 2015 हिंदू कमी होऊन ते 78 % झाले, तर 1950 मध्ये मुस्लिम लोकसंख्या प्रमाण 9.84 % एवढे होते, तर 2015 पंधरा मध्ये मुस्लिमांचे लोकसंख्येतले प्रमाण 14.09 % टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • विशेष म्हणजे भारतात हिंदूंच्या लोकसंख्येत 7.8 % घसरण झाली असली तरी मान्यमारमध्ये हीच घसरण 10 % खाली आहे, तर नेपाळमध्ये हिंदू लोकसंख्या कमी होत असून त्यामध्ये 3.6 % ३.६ घट झाली आहे.
  • पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल मे 2024 मध्ये प्रकाशित झाला असून जगातील 167 देशांमधील लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करून सदर अहवाल तयार करण्यात आला होता.
  • या अहवालाचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतात अल्पसंख्याकांचे केवळ रक्षणच करण्यात येत नाही, तर त्यांची भरभराट होत आहे. भारतातील लोकसंख्या बदल आणि बाहेरील देशातील लोकसंख्येची आकडेवारी याबाबत या अहवालात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लोकसंख्या बदलाची आव्हाने आणि संधी या दोन्हींबाबत या अहवालात चर्चा करण्यात आली आहे.
  • या अहवालाच्या मुद्द्यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चिंता व्यक्त केली आहे. हिंदूंची लोकसंख्या 7.8 % टक्क्यांनी घसरत असताना दुसरीकडे मात्र मुस्मील धर्मीयांची लोकसंख्या 43 % टक्क्यांनी वाढली आहे. काँग्रेसने अनेक दशके राज्य केल्यानंतर आपली ही परिस्थिती झाली आहे. जर त्यांच्या हातात जर पुन्हा सत्ता गेली असती, तर आज हिंदूंना राहण्यासाठी देश उरला नसता, अशी टीका मालवीय यांनी केली.

In 1950-2015, Hindu population dipped from 85% to 78%, Muslims rose to 14% from 10%

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात