विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला कुठली स्थान न मिळाल्यानंतर महाविकास आघाडीवर चिडलेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेतल्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर आले असताना राजकीय स्फोटामागून स्फोट घडविणे चालवले आहे. Prakash Ambedkar’s blast after blast
आधी साताऱ्यात प्रकाश आंबेडकर म्हणाले, इथले एक “पवारनिष्ठ” नेते भाजपच्या वाटेवर आहेत. फक्त ते आपल्याला राज्यपाल पद कधी मिळते, याची वाट पाहत आहेत. राज्यपाल पद निश्चित झाले की ते भाजपच्या वाटेवर निघून जातील. त्यामुळे साताऱ्यात तर्कवितर्क सुरू झाले. पवारनिष्ठ नेते श्रीनिवास पाटील हे पवार पावसात भिजलेल्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. पण त्यापूर्वी ते सिक्कीमचे राज्यपाल होते. मोदी सरकारनेच त्यांना राज्यपाल पद दिले होते. आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे श्रीनिवास पाटलांभोवतीचा संशय गडद झाला आहे.
त्यानंतर सोलापूर मध्ये गेलेल्या प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या बद्दल राजकीय स्फोट केला. लोकसभेच्या निवडणुका पार पडू देत सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे दोघेही नंतर भाजपमध्ये जातील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या काही प्रॉपर्टीचा समावेश नाही. त्यांच्यावर असलेल्या काही केसेसचा देखील त्यांनी समावेश केलेला नाही त्यामुळे सुशील कुमार आणि प्रणिती हे दोघेही आज ना उद्या भाजपमध्ये गेल्याशिवाय थांबणार नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यामुळे मतदानांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बद्दल सं संशय निर्माण झाला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले तरी ते त्यांच्या पक्षात टिकूनच राहतील याची कुणाला गॅरंटी वाटेनाशी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App