झारखंड काँग्रेसचे ‘X’ खाते निलंबित, अमित शाहांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी कारवाई

Jharkhand Congress 'X' account suspended, Amit Shah's fake video case action taken

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांना चौकशीसाठी बोलावले होते. Jharkhand Congress ‘X’ account suspended, Amit Shah’s fake video case action taken

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : झारखंड प्रदेश काँग्रेसचे इंटरनेट मीडिया हँडल एक्स निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांना चौकशीसाठी बोलावले होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले की, त्यांना नोटीस मिळाली असून वेळ आल्यावर ते आपल्या वकिलामार्फत उत्तर देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्षांना आपली बाजू लवकरात लवकर मांडण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या नावे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


अमित शहांचा फेक व्हिडिओ व्हायरल प्रकरणात FIR दाखल; यामध्ये आरक्षण संपवण्याचा खोटा दावा, दिल्ली पोलिसांकडे तक्रार


तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी बनावट व्हिडिओंच्या माध्यमातून भाजपला एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हायरल होत असलेल्या बनावट व्हिडीओमध्ये अमित शाह आरक्षणाला असंवैधानिक ठरवून ते रद्द करण्याची घोषणा करताना दाखवण्यात आले होते. तर मूळ व्हिडिओमध्ये शाह एसटी, एससी आणि ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याविषयी बोलत आहेत.

Jharkhand Congress ‘X’ account suspended, Amit Shah’s fake video case action taken

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात