विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी शिकवणी घेतली; मुलगी (मराठी) शिकली, प्रगती झाली!!, असे म्हणायची वेळ आज महाराष्ट्र दिनी आली.Chief Minister took tuitions; Girl Learned (Marathi), Made Progress!!
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फूड व्लॉगर कर्ली कामियाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत एक एपिसोड शूट केला. यामध्ये तिने मुख्यमंत्र्यांना कोणते मराठी खाद्यपदार्थ खायला आवडतात??, वगैरे प्रश्न विचारले. परंतु तिने सर्व मराठी खाद्यपदार्थांचे चुकीचे उच्चार केले. “पुरणपोळी” ला ती “पुरणपोली” म्हणाली, “कोथिंबीर वडी” ला ती “कोतमीर वडी” म्हणाली. “बोंबील फ्राय” ला ती “बॉम्बील फ्राय” म्हणाली. “ठाणे” शहराला ती “ठाणा” म्हणाली. मुख्यमंत्र्यांनी तिचे सगळे उच्चार ठीक करून दिले. तिला तसे उच्चार करायला लावले आणि मराठीत कोणत्या पदार्थाला नेमके काय म्हणतात??, हे शुद्ध भाषेत सांगितले. त्यामुळे कर्ली कामिया खुश झाली आणि आज मी मराठी शिकली, अशी पोस्ट तिने instagram वर लिहिली. मराठीतले अनेक उच्चार आपण चुकीचे करतो, पण मुख्यमंत्र्यांनी माझे उच्चार सुधारले. त्याबद्दल आभार, असे तिने आवर्जून लिहिले.
View this post on Instagram A post shared by Curly Tales | A Fork Media Group Co. (@curly.tales)
A post shared by Curly Tales | A Fork Media Group Co. (@curly.tales)
कर्ली कामियाने याआधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांच्याबरोबर देखील एपिसोड शूट केले. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर तिने महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एपिसोड शूट केला तो देखील काम मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App