नाशिकमध्ये भुजबळ इफेक्ट nullify; पण भाकऱ्या फिरवण्याची शिंदेंची क्षमता नाय!!

नाशिक : नाशिक लोकसभा बरीच भवती न भवती होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे नाशकातला छगन भुजबळ यांचा इफेक्ट पूर्ण nullify झाला, पण त्याचवेळी आपल्या पक्षात भाकऱ्या फिरण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांना दाखवता आली नाही, हे देखील सिद्ध झाले.

वास्तविक ज्या पद्धतीने भाजपने संपूर्ण देशभर तब्बल 103 खासदारांची तिकिटे कापून भाकऱ्या फिरवण्याची हिंमत दाखवली होती, तशी मर्यादित का होईना, पण एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांनी भाकऱ्या फिरवण्याची किंमत दाखविणे अपेक्षित होते. किंबहुना ती तशी राजकीय गरज होती. अर्थात अजित पवारांना भाकऱ्या फिरवण्यासाठी फारच मर्यादा होत्या, कारण मूळात त्यांच्या वाट्याला महायुतीत 48 पैकी चारच जागा आल्या. पाचवी जागा महादेव जानकर यांच्या रूपाने त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला द्यावी लागली, पण त्यानिमित्ताने परभणीत भाकरी फिरवली गेली हे खरे.

एकनाथ शिंदे यांनी देखील हेमंत पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी हिंगोलीतून कापली, पण त्यांच्या पत्नीला त्यांनी यवतमाळ मधून तिकीट देऊन विद्यमान खासदार भावना गवळी यांची भाकरी फिरवली. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत फक्त दीड भाकरी फिरवली. यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची मर्यादा स्पष्ट झाली.

अर्थात एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या 15 च्या 15 उमेदवारांच्या भाकरी फिरवणे अपेक्षित नव्हतेच. ते शक्य देखील नव्हते. परंतु भाजपच्या सल्ल्यानुसार आणखी दोन-तीन ठिकाणी भाकऱ्या फिरवणे अपेक्षित असताना त्यातही नाशिकची जागा ही बऱ्याच वरती असताना एकनाथ शिंदे नाशिक मधली भाकरी फिरवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे नाशिक मध्ये आता दोन्ही शिवसेना एकमेकांसमोरच उभ्या ठाकल्या आहेत. हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे या लढतीत ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव करण्यासाठी जबाबदारी शिंदेंवर आली आहे. हेमंत गोडसे 10 वर्षे खासदार असल्याने “अँटी इन्कमबन्सी” वर मात करण्याची जबाबदारी आता शिंदे आणि गोडसे या दोघांना एकत्र येऊन पार पाडावी लागणार आहे.

पण त्या पलीकडे देखील नाशिकमध्ये छगन भुजबळाने थेट मोदी आणि शाह यांची नावे घेऊन जी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून आपण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपुरते का होईना, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “वरचढ” नेते आहोत, असे दाखविण्याचा जो प्रयत्न केला होता, तो प्रयत्न मात्र पूर्ण फोल गेला.

छगन भुजबळ आता हेमंत गोडसे यांचे काम करतील किंवा न करतील, त्याने काही फरक पडणार नाही. भुजबळांनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचे शांतपणे स्वागत केले. प्रचाराला जेवढा वेळ मिळेल, तेवढा वेळ आम्ही कारणी लावू. हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघ पूर्ण माहिती आहे. कारण ते गेली 10 वर्षे खासदार आहेत, अशी वक्तव्य केली भुजबळांनी यातून ना फारसा उत्साह दाखवला ना विरोध करण्याची कुठली क्षमता दाखवली. त्यामुळे नाशकातला भुजबळ इफेक्ट बऱ्यापैकी nullify झाला असेच दिसून आले.

हिंदुत्ववादी मतदारांचा भुजबळांना विरोध

तसेही भुजबळांची महत्त्वाकांक्षा कितीही उफाळली असली, तरी भुजबळांची लोकसभेची उमेदवारी ही नाशिक मधल्या मतदारांना रुचली आणि पचली असती, असे म्हणणे धाडसाचे ठरले असते. मग भले अगदी त्यांनी मोदी आणि शाह यांची नावे घेतली असली, तरी प्रत्यक्षात नाशिक मधल्या तीन भाजप आमदारांचा किंबहुना एकूणच नाशिककरांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भुजबळांना विरोधच होता. भुजबळांची मध्यंतरीची सनातन धर्म विरोधातली आणि सरस्वती विरोधातली वक्तव्य त्यांना नाशिकमध्ये नडत होती. मराठा संघटनांनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करणे ही स्वाभाविक गोष्ट होती. त्यात नाविन्य नव्हते, पण भुजबळांना हिंदुत्ववादी मतदारांचा विरोध होता ही बाब त्यांचा इफेक्ट nullify होण्यात खऱ्या अर्थाने निर्णय ठरली. भुजबळांनी मोदी – शाह यांची नावे घेऊन देखील त्याचा फारसा परिणाम होऊ शकला नाही. उलट ज्या उमेदवाराने भुजबळांचा 2014 च्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 87 हजार मतांनी पराभव केला होता, तोच उमेदवार म्हणजे हेमंत गोडसे यांना स्वीकारण्याची वेळ भुजबळांवर आली.

बाकी अजय बोरस्ते, शांतिगिरी महाराज, अनिकेत महाराज शास्त्री वगैरे नावे फक्त माध्यमांनी चर्चेत ठेवून महायुतीतल्या वादाला रोज फोडणी दिली. त्यापलीकडे या नावाचा बाकी फारसा परिणाम झाला नाही.

Chagan bhujbal effect in nashik nullifyed, but eknath shinde couldn’t change the candidate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात