‘मोदींनी दाखवलेल्या मार्गावर मी चालेन…’ अनुपमा फेम रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल!

जाणून घ्या, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुली काय म्हणाली? I will follow the path shown by Modi Anupama fame Rupali Ganguly joins BJP

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान, ‘अनुपमा’ फेम टेलिव्हिजन अभिनेत्री रूपाली गांगुलीने राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

रुपालीसोबतच चित्रपट दिग्दर्शक अमय जोशी यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुली म्हणाली की, “ज्यावेळी मी विकासाचा हा महायज्ञ पाहते, तेव्हा मला वाटते की मीही त्यात सहभागी का होऊ नये.”

रुपाली पुढे म्हणाल्या, “मला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे जेणेकरून मी जे काही करते ते मी योग्य आणि चांगले करू शकेन. मी मोदीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन आणि देशाच्या सेवेत सहभागी होण्याचा प्रयत्न करेन. पक्षाला माझा अभिमान वाटेल असे काहीतरी मी केले पाहिजे.”

I will follow the path shown by Modi Anupama fame Rupali Ganguly joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात