127 वर्षे जुना गोदरेज समूहात वाटणी; आदि-नादिर गोदरेज यांना उद्योगांच्या लिस्टेड, तर चुलत भाऊ जमशेद यांना अनलिस्टेड कंपन्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : साबणापासून लॉकरपर्यंत देशातील प्रत्येक घरात आपल्या उत्पादनांमुळे स्थान निर्माण करणारा गोदरेज ग्रुप आता विभागला जाणार आहे. गोदरेज कुटुंबाने 127 वर्षे जुन्या ग्रुपला दोन भागांमध्ये विभाजित करण्याचा करार केले आहे. या कराराअंतर्गत 82 वर्षीय आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना एक हिस्सा, तर दुसरा हिस्सा चुलत भाऊ जमशेद आणि बहीण स्मिता गोदरेज यांना मिळाला आहे.127-year-old Godrej Group Split Conglomerate Into Two Branches, Adi-Nadir Godrej And Jamshed

गोदरेज आणि त्यांच्या भावाला लिस्टेड कंपन्या मिळतील

आदि आणि नादिर यांच्या मालकीच्या गोदरेज इंडस्ट्रीजच्या पाच लिस्टेड कंपन्या आहेत. जमशेद आणि स्मिता यांना अनलिस्टेड कंपनी गोदरेज अँड बॉयसची लँड बँक आणि मुंबईतील तिच्याशी संबंधित मुख्य मालमत्ता वारसाहक्काने मिळाली आहे.



गोदरेज इंडस्ट्रीज समूहातील सूचीबद्ध कंपन्या गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि एस्टेक लाईफसायन्सेस आहेत. त्याचे अध्यक्ष नादिर गोदरेज असतील आणि त्यावर आदि गोदरेज, नादिर आणि कुटुंबाचे नियंत्रण असेल. आदिंचा 42 वर्षीय मुलगा पिरोजशा गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी उपाध्यक्ष असतील. ऑगस्ट 2026 मध्ये ते नादिरची जागा घेतील.

दुसरीकडे, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये गोदरेज आणि बॉयस आणि त्याच्या सहयोगींचा समावेश आहे, ज्याची एअरोस्पेस आणि एव्हिएशनपासून संरक्षण, फर्निचर आणि आयटी सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उद्योगांमध्ये उपस्थिती आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जमशेद गोदरेज हे नियंत्रित करतील. त्यांची बहीण स्मिता यांची मुलगी न्यारिका होळकर (42) या तिच्या कार्यकारी संचालक असतील. याच समूहाची मुंबईत 3,400 एकर जमीन आहे. समूहाची एकूण किंमत सुमारे 2.34 लाख कोटी रुपये आहे.

तीन वर्षे विभाजनाची प्रक्रिया सुरू होती

गोदरेज समूहाच्या विभाजनाची प्रक्रिया 3 वर्षांपासून सुरू होती. आता वाटणीनंतर कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या कंपनीतील स्टेक विकून निघून जातील. आदि आणि नादिर गोदरेज यांनी या वर्षाच्या सुरुवातीला गोदरेज अँड बॉयसच्या बोर्डाचा राजीनामा दिला होता, तर जमशेद गोदरेज यांनी GCPL आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या बोर्डावरील जागा सोडल्या आहेत.

1897 मध्ये स्थापना

अर्देशीर गोदरेज आणि पिरोजशा बुर्जोर्जी गोदरेज यांनी 1897 मध्ये या समूहाची स्थापना केली. समूहाची एकूण किंमत सुमारे 2.34 लाख कोटी रुपये आहे.

127-year-old Godrej Group Split Conglomerate Into Two Branches, Adi-Nadir Godrej And Jamshed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात