पाणी देण्याचा वचनभंग करणाऱ्या बड्या नेत्याला धडा शिकवण्याची वेळ, पण त्यांची निवडणूक लढवण्याची हिंमतच नाही!!

Time to teach a lesson to the great leader who broke his promise to give water.

विशेष प्रतिनिधी

माढा : महाराष्ट्रातील जनता जेव्हा प्रेम देते, आशीर्वाद देते, तेव्हा कोणतीच कसर सोडत नाही, भरभरून देते. पण जर कोणी वचनभंग केला, तर हीच महाराष्ट्राची जनता तेही बरोब्बर लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशेब व्यवस्थित चुकता करते, वचनभंग करणाऱ्यांना धडा शिकवते, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांवर हल्लाबोल केला. Time to teach a lesson to the great leader who broke his promise to give water.

महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे वाभाडे काढले. 60 वर्षांत काँग्रेस जे करू शकले नाही, ते आम्ही करून दाखविले. 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले, असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले :

15 वर्षांपूर्वी एक बडे नेते लढण्यासाठी माढात आले होते. त्यांनी दुष्कळावर मात करण्याची मावळत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेतली होती. माढ्याला पाणी देणार असे या नेत्याने सांगितले होते. पण त्या नेत्याने वचनभंग केला. आजही मराठवाडा, विदर्भ पाण्यासाठी वणवण फिरत आहे. त्या नेत्याने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्या नेत्याने महाराष्ट्रातील लोकांना धोका दिला आहे. आश्वासन पूर्ण न केल्याने आज त्या नेत्याची माढातून लढण्याची हिंमत होत नाही.

हेच बडे नेते कृषिमंत्री असताना त्यांनी ऊसाला भाव दिला नाही. पण आमच्या काळात ऊसाचा एफआरपी प्रचंड वाढला. बडे नेते कृषीमंत्री असताना एफआरपी 200 रुपये होता, आता आमच्या काळात 350 रुपये आहे. बड्या नेत्यांनी इथल्या सहकारी साखर कारखान्याच्या आयकर का माफ केला नाही. कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न सोडवला नाही. बडे नेते फक्त बड्या बड्या बाता मारतात. नेते फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. इथेनॉल उत्पादनाला आम्ही चालना दिली आहे. इथेनॉलमुळे 70000 कोटी जादा पैसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले.

काँग्रेसने 60 वर्षात जे केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केली आहे. शरीराचा कण कण, जीवनाचा क्षण क्षण देशाला समर्पित केले आहे. जनतेची प्रेम हीच आमची मोठी ताकद आहे. 60 वर्षात जे झालं नाही ते या सेवकाने केले आहे. 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून मुक्त केले आहे. 25 कोटी लोकांना गरीबीतून मुक्त करण्याचे सगळे पुण्य तुम्हला लाभणार आहे. त्या पुण्याचा खरा हकदार मी नाही तर तुम्ही आहे. काँग्रेस गेली 60 वर्षे फक्त गरिबी हटावचा नारा देत बसले. आज 80 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. देशात वेगाने विकासकाम सुरू केले आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही पूर्ण केला. सिंचनाची अनेक कामे आम्ही वेगाने पूर्ण करत आहे. मी 10 वर्षांत अनेक कामे केली. महाराष्ट्राची जनता प्रेमही करते आणि हिशेबही बरोबर करते. प्रत्येक शेतात आणि घरापर्यंत पाणी पोचवणे हेच माझे मिशन आहे. 5 वर्षांत 11 कोटी घरात नळाचे पाणी दिले. अमृत सरोवर हे अमृत महोत्सवी वर्षात योजना सुरू केली.

सहकार क्षेत्रासाठी आम्ही नवीन मंत्रालय निर्माण केले आहे. विकासात सहकारी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशात पुढील पाच वर्षात सगळीकडे साठवणूक केंद्रे तयार करणार आहे.

वीजबिले संपवण्यासाठी सोलर वापर योजना आणली आहे. प्रत्येक घराचे लाईट बील शून्यावर आणायचे आहे हे माझे स्वप्न आहे.   एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत.

काँग्रेसचे सरकार तुम्हाला लुटणारे सरकार आहे. तुमची संपत्ती तुमच्या मुला-बाळांना न देता तुमच्यकडून काढून घेऊन सरकारमध्ये जमा करायला सांगत आहे. तुमची संपत्ती लुटणारे सरकार तुम्हाला देशात हवं आहे का? असा सवला देखील पंतप्रधानांनी केला.

राम मंदिरांचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखविले आहे. मताच्या राजकारणामुळे काँग्रेसने राम मंदिर बांधले नाही. आम्ही राम मंदिक बांधून 500 वर्षाचे स्वप्न पूर्ण केले आहे.

मतदान केल्याशिवाय चहापणी  करु नका. कितीही ऊन असले तरी मतदान जाऊन करा.  रणजीत सिंह निंबाळकरांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मोदींनी केले आहे.

Time to teach a lesson to the great leader who broke his promise to give water.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात