राजस्थानचे काँग्रेसचे माजी आमदार विवेक धाकड यांनी हाताची नस कापून केली आत्महत्या

Former Rajasthan Congress MLA Vivek Dhakad committed suicide

चारवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि नऊ महिनेच होते आमदार Former Rajasthan Congress MLA Vivek Dhakad committed suicide

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: राजस्थानमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विवेक धाकड यांनी आत्महत्या केली. त्यांनी हाताची नस कापून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भिलवाडा जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते म्हणून त्यांची ओळख होती. विवेक धाकड यांचा गुरुवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार विवेक धाकड यांनी आत्महत्या केली आहे. माजी आमदार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. त्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानी जमा होऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार भिलवाडा येथील सुभाष नगर भागात राहत होते. गुरुवारी सकाळी ते राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार करून मृत घोषित केले.



डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या हातातील नस कापली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच सुभाष नगर पोलीस ठाण्याने जिल्हा रुग्णालय गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसही काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

विवेक धाकड यांनी भिलवाडा येथील मांडलगढ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 4 वेळा निवडणूक लढवली. मात्र विजय त्यांना पोटनिवडणुकीत मिळाला होता. वसुंधरा राजे राज्याच्या मुख्यमंत्री असताना 2018 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. कीर्ती बैसा यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. धाकड हे ९ महिने मांडलगडचे आमदार होते. तर तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. विवेक धाकड यांनी 2013, 2018 आणि 23 मध्ये मांडलगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Former Rajasthan Congress MLA Vivek Dhakad committed suicide 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात