बंगालमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हटवलं!

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; सुवेंदू अधिकारी यांनी दोघांवर आक्षेप घेतला होता. In Bengal two high ranking officials were removed from the office of the Chief Election Officer

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी बंगालमधील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यामध्ये अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी अमित राय चौधरी आणि संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी राहुल नाथ यांचा समावेश आहे. या दोघांच्या जागी नियुक्तीसाठी निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे नावे मागवली आहेत.

राज्य निवडणूक आयोग कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अधिकारी दीर्घकाळापासून येथे कार्यरत होते. अमित राय चौधरी गेल्या 10 वर्षांपासून येथे काम करत होते, तर राहुल नाथ सहा वर्षांपासून काम करत होते. भाजपचे आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी दोघांवर आक्षेप घेतला होता.



निवडणूक आयोगाने अलीकडेच बंगालमधील अनेक उच्च पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही काळापूर्वी आयोगाने बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे आणि कोलकाता पोलिस आयुक्त राहिलेले राजीव कुमार यांना बंगालच्या पोलिस महासंचालक पदावरून हटवले होते. शिवाय निवडणूक आयोगाने अनेक जिल्हा अधिकारीही बदलले आहेत.

In Bengal two high ranking officials were removed from the office of the Chief Election Officer

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात