शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केली नावांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी लोकसाभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष उमेदवारी यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. First list of five candidates for Lok Sabha announced by Sharad Pawar group!

या यादीमध्ये अपेक्षेनुसार बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुर मधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली गेली. तर वर्धा – अमर काळे, दिंडोरी – भास्कर भगरे, अहमदनगर – नीलेश लंके या उमेदवारांचाही यादीत समावेश आहे. पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

पवार गटाकडून अद्याप भिवंडी, माढा, बीड, रावेर, सातारा या ठिकाणचा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांसाठी आपल्याला दुसऱ्या यादीची प्रतीक्षा कारवी लागणार आहे.

महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवर घोळ सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काही जागांवरील उमेदवारांची घोषणा करीत आघाडी घेतली होती, त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

First list of five candidates for Lok Sabha announced by Sharad Pawar group!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात