‘मी हिरोईन किंवा स्टार नाही, तर…’ ; निवडणुकीच्या प्रचारासाठी मंडी येथे पोहचल्यावर कंगना रणौतचं विधान!

हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.


विशेष प्रतिनिधी

शिमला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री कंगना रणौतला मंडीतून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, कंगना रणौत निवडणुकीच्या प्रचारासाठी मंडीत पोहोचली. येथे तिने रोड शो केला आणि त्यादरम्यान ती म्हणाला की मी हिरोईन किंवा स्टार आहे असे समजू नका. कंगनाला तुमची मुलगी, बहीण आणि कुटुंब समजा.I am not a heroine or a star but your daughter Kangana Ranauts statement after reaching Mandi for election campaign



मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिल्यानंतर कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आणि सांगितले की, माझ्या मातीने मला बोलावले आणि मला माझ्या मातीची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौत नुकतीच दिल्लीतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यालयात पोहोचली होती. येथे तिने नड्डा यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. कंगना रणौतने मंडी मतदारसंघातून पक्षाचे तिकीट दिल्याबद्दल पक्षाध्यक्षांचे आभार व्यक्त केले.

कंगना रणौत आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे. नुकतच, सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया आयडीवरून कंगना रणौतबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली होती.

I am not a heroine or a star but your daughter Kangana Ranauts statement after reaching Mandi for election campaign

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात