सीबीआय न्यायालयाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय लखनऊ न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये माफियाचे तीन शार्प शूटर अतिक अहमद, फरहान, आबिद आणि अब्दुल कवी यांचाही समावेश आहे.All seven accused in BSP MLA Raju Pal murder case sentenced to life imprisonment
याशिवाय जावेद, इसरार, रणजीत पाल आणि गुल हसन यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्या प्रकरणातील माफिया दोन आरोपी अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवार 25 जानेवारी 2005 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसपा आमदार राजू पाल हे दोन वाहनांच्या ताफ्यातून धूमनगंजच्या निवान येथील एसआरएन हॉस्पिटलमधील पोस्टमॉर्टम हाऊसमधून घरी परतत असताना सुलेमसराय येथील जीटी रोडवर त्यांच्या वाहनाला घेराव घालून गोळीबार करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App