आसाममध्ये 2026 पर्यंत काँग्रेसचा एकही नेता उरणार नाही- हिमंता बिस्वा सरमा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले


विशेष प्रतिनिधी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असा दावा केला आहे की 2026 पर्यंत आसाममध्ये काँग्रेसचा एकही नेता उरणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे भवितव्य ‘अंधारात’, राज्यातील सर्वात जुना पक्ष 2026 पर्यंत संपुष्टात येणार आहे.Assam will not have a single Congress leader by 2026 Himanta Biswa Sarma

याचबरोबर “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा जानेवारी 2025 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासाठी मी 2 मतदारसंघ निश्चित केले आहेत. सर्व नेते आपल्या हातात आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हा मी त्यांना घेऊन येईन. ” असंही म्हटलं आहे.



आसाममधील लखीमपूर जिल्ह्यातील नौबोइचा येथील आमदार भरत चंद्र नारा यांनी सोमवारी आपल्या पत्नीला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने उदय शंकर हजारिका यांना लखीमपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. या जागेवरून काँग्रेस माजी केंद्रीय मंत्री राणी नारा यांना तिकीट देईल, अशी आशा नारा यांना होती. त्यांच्या पत्नी राणी नारा तीन वेळा लखीमपूरमधून खासदार आणि एकदा राज्यसभेच्या सदस्यही होत्या.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की राणी नारा आणि हजारिका लखीमपूरमधून तिकिटाची मागणी करत होते, हजारिका यांनी काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Assam will not have a single Congress leader by 2026 Himanta Biswa Sarma

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात