महाविकास आघाडीतून उमेदवारी वाटपात काँग्रेसची आघाडी; उरलेला तिढा सोडवण्यासाठी पवार मातोश्रीच्या दारी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीतून उमेदवारी वाटपात काँग्रेसने घेतली आघाडी, त्यामुळे उरलेला तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मातोश्रीच्या दारी गेले आहेत.Congress lead in allotment of nominations from Mahavikas Aghadi; Pawar Matoshree’s door to solve the remaining rift!!

महाराष्ट्रात काँग्रेसने आपल्या वाटेला आलेल्या जागांपैकी तब्बल 12 उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्या उलट उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकही उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. याला अपवाद फक्त बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी हा राहिला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 7 जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांपैकी देखील एकही उमेदवार उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करू शकलेली नाही. त्यामुळे आपापसांतला तिढा सोडवण्यासाठी शरद पवारांनी आज सायंकाळी जयंत पाटलांना घेऊन मातोश्री गाठली. मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी त्यांच्या समवेत जयंत पाटील यांच्याबरोबरच संजय राऊत हे देखील उपस्थित होते.



एरवी शरद पवार वचितच मातोश्रीवर गेले. बाळासाहेब ठाकरे हयात असताना पवार मातोश्रीवर जायचे, पण बाळासाहेब हे पवारांना ज्येष्ठ होते. त्यामुळे पवारांचे मातोश्रीवर जाणे राजकीय दृष्ट्या देखील खपून जायचे. त्या उलट उद्धव ठाकरे पवारांना राजकारणात खूप ज्युनियर आहेत, त्यामुळे पवारांनी मातोश्रीवर जाण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना सिल्वर ओक वर बोलवून घेणे हे पवार समर्थकांना इष्ट वाटते. पण असे असतानाही शरद पवार काही पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले असे नव्हे यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये हे पटवून द्यायला मातोश्रीवर गेले होते पण उद्धव ठाकरेंना ते राजीनामा देण्यापासून परावृत्त करू शकले नव्हते.

शिवाय सध्या महाराष्ट्रातले राजकीय परिस्थितीच अशी आहे, की महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचाच पक्ष मोठा आहे. आमदार किंवा खासदार संख्येवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठेपण अवलंबून नाही. उद्धव ठाकरेंकडे उरलेली शिवसेना देखील महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ घालण्याइतकी प्रबळ आहे, हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंना मोठेपणा दिला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर देखील त्यांच्याकडे 6 खासदार उरले आहेत, त्या उलट शरद पवारांकडे तीनच खासदार उरले आहेत. त्यापैकी 1 खासदार तर घरचाच आहे. त्यामुळे शरद पवारांची फुटलेली राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या फुटलेल्या शिवसेनेपेक्षा संघटनात्मक दृष्ट्या दुबळीच आहे. त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरेंना मोठेपणा देऊन त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Congress lead in allotment of nominations from Mahavikas Aghadi; Pawar Matoshree’s door to solve the remaining rift!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात