भाजपच्या ‘या’ राजमाता तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणार

बंगालच्या या जागेवरून निवडणूक लढवणार; २० मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. BJPs Rajmata Amrita roy will challenge Trinamool Congresss Mahua Moitra in the Lok Sabha elections

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नवीन जिंदाल, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासह अनेक हायप्रोफाईल चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये सर्वात खास नाव आहे ते म्हणजे बंगालच्या राजमाता अमृता रॉय. बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून त्या तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना टक्कर देणार आहेत.


बिग बॉस मराठी सीजन एकची विजेती मेधा धाडेचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश


यावेळी महाराजा कृष्णचंद्र यांचे नाव थेट राजकारणाशी जोडले गेले आहे. अमृता रॉय या कृष्णनगरच्या प्रतिष्ठित राजबाडीच्या राजमाता आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अमृता रॉय या महाराजा रुद्र चंद्र रॉय आणि कृष्णचंद्र रॉय यांच्या नादिया रॉय कुटुंबातील 39व्या वंशज, सौमिश चंद्र रॉय यांच्या पत्नी आहेत. तर त्यांचा मुलगा मनीष कलकत्ता उच्च न्यायालयात वकील आहे.

2019 मध्ये टीएमसीच्या महुआ मोईत्रा कृष्णनगर मतदारसंघातून सुमारे 63 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या, परंतु यावेळी ही निवडणूक महुआ मोईत्रा यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकते. कारण भाजपने नादिया राजघराण्याच्या राज मातेला उमेदवारी दिली आहे. अमृता रॉय यांनी २० मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २४मार्च रोजी पाचवी यादी जाहीर होताच भाजपने त्यांना कृष्णानगरमधून उमेदवारी दिली.

BJPs Rajmata Amrita roy will challenge Trinamool Congresss Mahua Moitra in the Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात