विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या गांधी परिवाराला भाजपला डिवचायची संधी मिळाली आणि भाजप नेते साधली नाही असे कधी घडलेच नाही. रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा गांधी परिवाराला डिवचले आहे. BJP leader sent 3 Savarkar cinema tickets to Gandhi family!!
भाजपचे मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांनी मुंबईतल्या एका थिएटर मधल्या सावरकर सिनेमाच्या शो ची तीन तिकिटे आणि पॉपकॉर्न तसेच कोल्ड्रिंगची कुपने गांधी परिवाराला पाठवून दिली आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका या गांधी परिवाराने पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंगचा आनंद घेत स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहावा आणि मग सावरकरांवर राहुल गांधींनी बोलावे, अशा शब्दांमध्ये तिवाना यांनी गांधी परिवाराला टोचले आहे.
काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवल्याने तुमच्याकडे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंगचेही पैसे नसतील, त्यामुळे कुपन पाठवल्याचे तिवाना यांनी म्हटले आहे.
तेजंदर सिंग तिवाना म्हणाले की, राहुल गांधीजी जय श्रीराम! मी तुम्हाला, सोनिया जी आणि प्रियंका जी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तीन तिकीटे पाठवत आहे. तुम्ही देशाच्या कायमस्वरूपी विरोधी पक्षाचे नेते आहात. त्यामुळे तुम्हाला आपल्या देशाच्या इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. माझा दावा आहे की हा चित्रपट बघून आपला आणि आपल्या परिवाराचे डोळे उघडतील. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहून या!!
राहुलचे सावरकरांच्या गाण्याने स्वागत
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आले होते. मुंबईत शिवसेना भवनासमोर त्यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देसाई यांनी स्वागत केल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनाच्या परिसरातून थोडासा पुढे गेला. त्यानंतर राहुल गांधी शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीकडे जात असताना बँड पथकाने अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “जयोस्तुते जयोस्तुते” या गाण्याची सुरावट वाजवली होती. राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App