केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीने नाक खुपसले; अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याबद्दल भारताने फटकारले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यांना कोर्टाने 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले मात्र आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीने भाष्य करून भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खूपसले. पण त्यावर भारताने ताबडतोब कठोर शब्दांमध्ये सुनावत जर्मनीला फटकारले. German Foreign Ministry spokesperson comments on the arrest of Delhi Chief Minister Arvind Kejriwal

केजरीवालांच्या अटकेवर भारतात राजकीय गदारोळ सुरू असताना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य करून दुसऱ्या देशातल्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याचा संकेत धुडकावला. पण त्यावर कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवत भारताने जर्मनीला फाटकारले.

भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत जॉर्ज एनजवीलर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे.

आमच्या न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याप्रकरणी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. “आपल्या अंतर्गत बाबींवर परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या टिप्पण्यांबद्दल भारताचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज नवी दिल्लीतील जर्मन मिशनच्या उपप्रमुखांना बोलावून जाणीव करुन दिली. आम्ही अशा टिप्पण्यांना आमच्या न्यायिक प्रक्रियेत आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यातील हस्तक्षेप मानतो. ज्याप्रकारे भारत आणि इतर लोकशाही देशांमध्ये कायदा आपलं काम करतो, त्याचप्रमाणे येथेही कायदा आपलं काम करेल. याप्रकरणी एका बाजूने आपली मतं बनवणे योग्य नाही,” असे ते म्हणाले आहेत.

ईडीने गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यघोटाळा प्रकरणी अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने भाष्य केले. आम्हाला आशा आहे की न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित सर्व मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे या प्रकरणात देखील लागू होतील, असे ते म्हणाले होते.

कोणत्याही व्यक्तीप्रमाणे अरविंद केजरीवालांना निष्पक्ष खटल्याचा हक्क आहे. त्यांनी कोणत्याही निर्बंधांविना कायदेशीर मार्गांचा निवड करण्याचा अधिकार आहे. निर्दोषतेचा अंदाज हा कायद्याच्या नियमाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो या प्रकरणात देखील लागू झाला पाहिजे, असे वक्तव्य जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले होते मात्र हा भारताच्या अंतर्गत कारखाना हस्तक्षेप आहेत तो सहन केला जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सुनावत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जर्मनीला फटकारले.

केजरीवालांना 28 मार्चपर्यंत कोठडी

अरविंद केजरीवाल यांना राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने 28 मार्चपर्यंत ईडी रिमांडमध्ये पाठवलं आहे. ईडीने कोर्टात हजर केल्यानंतर 10 दिवसांची रिमांड मागितली होती. पण कोर्टाने 6 दिवसांची रिमांड मान्य केली. आता 28 मार्चला दुपारी 2 वाजता त्यांना कोर्टात हजर केले जाईल. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आपण राजीनामा देणार नसून जेलमधूनच सरकार चालवणार असल्याचं म्हटलं आहे.

गील भाजपाला सात ते आठ टक्के जादा मते मिळतील. ५१ टक्के मतदान घेऊन महाराष्ट्रात ४५ प्लस जागा महायुतीला मिळतील. पंतप्रधान कोण व्हावे हे जनतेला चांगले कळते, असेही ते म्हणाले.

German Foreign Ministry spokesperson comments on the arrest of Delhi Chief Minister Arvind Kejriwal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात